गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षांतर करणार या चर्चेला उधान आल होत. या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. रविवारी (2 जूलै) महाराष्टाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन त्यांना शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यावर राजकीय नेते मंडळींंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मनोरंजन विश्वातून देखील यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
अजित पवार ( Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. या सर्व प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) ट्विट केले आहे. तिने ट्विट करताना लिहिले की, “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” तसेच तिने Maharashtrapolitics असा हॅशटॅग दिला आहे. तिच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या ट्विटवर युजरने अनेक कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “मतदान कार्ड विकायची वेळ येणार नाही ना ? लोकशाही नावापूरतीच, बाकी सालट काढायची काम सुरूच राहणार.” दुसऱ्याने लिहिले की, “ज्यात शेंगदाणे खऊट, बेचव फरसाण, सडलेला कांदा आणि आता राहिलेलं हे कडवट लिंबू पिळले गेलेय… आता खा आणि ओका अशी अवस्था झालीय महाराष्ट्रातल्या लोकांची… ही भेळ विकणारे संजय राऊत नामक फेरीवाला अजून आला नाहीये.”
भेळ हवीये भेळ ????
सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!! #Maharashtrapolitics— TEJASWWINI (@tejaswwini) July 2, 2023
तेजस्विनीपंडित विषयी बोलायचे झाल तर, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका केली होती. त्यानंतर ती ‘रखेली’ या नाटकात झळकली. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून प्रचंड ओळख मिळाली. तसेच ती नुकतीच आदिपुरूष या चित्रपटात दिसली. या चित्ररटातील तिच्या भूमिकेली प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ( After Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister, Tejaswini Pandit’s tweet is in discussion)
अधिक वाचा-
– जाळ अन् धूर संगटच! अभिनेत्री नम्रता मल्लाने दाखवला बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ
–साेनम लंडनच्या रस्त्यावर दिसली वायुसाेबत फिरताना, अभिनेत्रीने शेअर केले गोंडस फोटो