‘बॉयकॉट लालसिंग चड्ढा’वर अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हे सगळं…’

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून देशभरात या चित्रपटाला जोरदार विरोध दर्शवला जात असून या विरोधाचा चित्रपटाच्या कमाईवर थेट परिणाण होताना दिसत आहे. आमिर खानच्या या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता आमिर खान आणि करिना कपूरचा लालसिंग चड्ढा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी अनेकांनी केली होती. याचे कारण म्हणजे लालसिंग चड्ढा चित्रपट हा हिंदूविरोधी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच या चित्रपटाला विरोध होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या लेखिकेच्या सोशल मीडियावर हिंदूविरोधी पोस्ट मोठ्या प्रमाणावर असल्याचाही आरोप करण्यात त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळेच या चित्रपटाला सर्वत्र जोरदार विरोध होत आहे. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच एका मुलाखतीत अजित पवार यांना “आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटाला हिंदूविरोधी चित्रपट बोलल्याचे बोलले जात आहे यावर तुमचे मत काय?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी “जो चित्रपट मी पाहिलाच नाही त्यावर काय बोलणार,”अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्याचबरोबर अजित पवार यांनी पुढे सांगितले की,”असे अनेक चित्रपट आले, ज्यावर बहिष्कार घालावा किंवा कोणी पाहायला जाऊ नका असं बोलले गेले. पण मला तर वाटतं लोकांनी यांचे चित्रपट जास्तीत जास्त पाहावे यासाठी हे केलं जातंय. जेव्हा ‘पद्मावती’चा ‘पद्मावत’ झाला त्यावेळी यात काय नवीन म्हणून लोकांनी तो पाहिला. आता हा बॉयकॉट करावा असा ट्रेंड सुरू करण्यात आलाय. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा का सुरू आहे म्हणून लोक पाहणार. चित्रपटासाठी ही एक प्रकारचा पब्लिसिटी स्टंट असण्याचीही शक्यता आहे.” दरम्यान लालसिंग चड्ढानंतर  आता शाहरुख खानचा पठाण चित्रपटावरही बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा – आता तर ऋतिक रोशनही म्हणाला, ‘आमिर खानचा सिनेमा म्हणजे, एकदम…’
अरेरे! ब्रा न घालताच कार्यक्रमात पोहोचली प्रियांका चोप्रा, कॅमेऱ्यासमोरचं झाली ‘अशी’ फजिती
देशाच्या चोरांना पकडणार सुष्मिताच्या प्रेमात पडलेले ललित मोदी; म्हणाले, ‘भारत सरकारने संधी दिली तर…’

Latest Post