Friday, May 24, 2024

साेनम लंडनच्या रस्त्यावर दिसली वायुसाेबत फिरताना, अभिनेत्रीने शेअर केले गोंडस फोटो

बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये असून सुट्टयांचा आनंद घेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने तिचा मुलगा आणि पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

सोनम कपूर (sonam kapoor) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लंडनमधील नॉटिंग हिल्सवर पती आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत फिरताना दिसत आहे. फोटोंमध्ये, सोनम ओव्हरसाईज शर्ट आणि स्नीकर्ससह ट्रॅक पॅंटमध्ये दिसत आहे, तर आनंद टी-शर्ट आणि ट्रॅक सूटमध्ये दिसत आहे. फाेटाेंमध्ये सोनमने मुलगा वायूला आपल्या मिठीत घेतले आहे. वायूने एक को-ऑर्डर सेट परिधान केलेला दिसत आहे. यासाेबतच सोनम आणि वायुने मॅचिंग स्नीकर्स घातले आहेत.

आंटी रिया कपूरनेही सोनमच्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फाेटाेंवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘येथे लहान मुलाचे स्नीकर्स लाइक करण्यासाठी वेगळे बटण असावे’, तर दुसर्‍याने लिहिले, ‘लव इट.’ सोनम कपूरने 2018मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले आणि ऑगस्ट 2022मध्ये मुलगा वायूला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

अभिनेत्री सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर साेनम लवकरच ‘ब्लाइंड’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शोम मखिजा आहेत. या चित्रपटात सोनमशिवाय लुसी आर्डेन आणि शुभम सराफ देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनम एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, जी पाहू शकत नाही. ‘ब्लाइंड’ हा चित्रपट 2011मध्ये आलेल्या कोरियन चित्रपट ब्लाइंडवर आधारित आहे. (bollywood sonam kapoor was seen walking on the streets of london with son vayu the actress shared cute pictures)

अधिक वाचा- 
किरण माने लवकरच ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…
लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर झालेल्या इशिता दत्ताने शेअर केला फोटो, एक्सप्रेशन्स देत दाखवला बेबी बंप

हे देखील वाचा