Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता लोखंडेनंतर ‘ही’ अभिनेत्री करणार एंट्री; एकदा वाचाच

सलमान खानच्या रिऍलिटी शो ‘बिग बॉस‘चे चाहते सीझन 17ची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 17 बद्दल मोठी चर्चा रंगली आहे. हा शो लवकरच ऑन एअर होणार आहे. शोचे अनेक टीझर रिलीज करण्यात आले आहेत. या शोमध्ये कोणते स्पर्धक येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशा बातम्या आहेत की यावेळी शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन या शोमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, दोघांच्या प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन या दोघांनीही बिग बॉसच्या (Bigg Boss)  घरात जाण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. अंकिता आणि विक्की यांनी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी शॉपिंग सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी 200 कपडे खरेदी केले आहेत. शोमध्ये एक ड्रेस पुन्हा रिपीट होणार नाही याचा प्लॅन त्यांनी केला आहे.

अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्की जैन हे एक व्यावसायिक आहेत. ते अंकिताचे पती आहेत. जर अंकिता आणि विक्की बिग बॉसच्या घरात प्रवेश केले तर ते या शोचे एक आकर्षण ठरतील. त्यांच्यातील प्रेम आणि नातेसंबंध प्रेक्षकांना आवडेल. ‘बिग बॉस 17’ साठी आणखी एक नाव समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic)

 ‘इश्कबाज’ फेम सुरभी चंदनाचे नाव शोसाठी फायनल करण्यात आले आहे. यावेळी शोची थीम सिंगल वर्सेस कपल आहे. याचा अर्थ असा की काही स्पर्धक एकटे प्रवेश करतील, तर काही त्यांच्या जोडीदारासह प्रवेश करतील. सलमान खानचा शो 15ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शोची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता असेल. या शोसाठी राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी यालाही अप्रोच करण्यात आले आहे. मात्र, त्याने या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. (After Ankita Lokhande, Surbhi Chandna of Ishqbaaz fame will also be seen in Bigg Boss 17)

आधिक वाचा-
‘या’ अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम? चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘मी अभिनय…’
‘महाराजांचं नाव फक्त धर्माच्या अंगानं…’; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

हे देखील वाचा