Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात फारसे डायलॉग न बोलता, तिने प्रेक्षकांना पुरते वेडे करून सोडले. आता शालू सोशल मीडियावर जलवा करताना दिसते. वेगवेगळ्या पण जबरदस्त लूकमधील फोटो शेअर करत, ती बरीच लाईमलाईटमध्ये राहते. आता तिने फोटो शेअर करत, कोरोनाच्या संकटामध्ये सापडलेल्या लोकांना धैर्य दिले आहे.

शालूने अलीकडेच फेसबुकवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच या फोटोतही ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने एका खुर्चीवर बसून, फोटोसाठी पोज दिली आहे. तिचे वेड लावणारे स्मित नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच फोटोचे कॅप्शनही विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “संकटं तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.” असे म्हणत तिने संकटात सापडलेल्यांचे मनोबल वाढवले आहे.

https://www.facebook.com/100044631000266/posts/320688959428802/

राजेश्वरीसुद्धा अलीकडेच कोरोनाला बळी पडली होती. ही माहिती स्वतः अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. मात्र, योग्य उपचार घेतल्यानंतर, ती अल्पावधीतच बरी झाली. बरी होऊन आता ती सोशल मीडियावर पुन्हा त्याच ऊर्जेने सक्रिय झाली आहे.

राजेश्वरीच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाले, तर तिचा जन्म ८ एप्रिल, १९९८ रोजी पुण्यात झाला होता. ती तिच्या पालकांसोबत राहते. तिचे वडील एका बँकेत काम करतात. तसेच तिने पुण्याच्या जोग एज्युकेशन ट्रस्टमधून शालेय शिक्षण घेतले. बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने सिंहगड कॉलेज, पुणे येथून बी.कॉम मध्ये पदवी मिळवली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश

हे देखील वाचा