दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश


दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा असा अभिनेता होता, जो आपल्या सहजसुंदर अभिनयाने घराघरात पोहोचला होता. त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचा फोटो पुन्हा एकदा, बंगाली शाळेच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणात आला आहे. पुस्तकात सुशांतची प्रसिद्ध टीव्ही मालिका, ‘पवित्र रिश्ता’ मधून घेतलेला फोटो ठेवण्यात आला आहे. या फोटोमध्ये मालिकेत त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे, आणि मुलाची भूमिका साकारणारा बाल कलाकारही दाखविला आहे. शाळेतील मुलांना कुटुंबातील महत्त्व, आणि नाते सांगण्यासाठी अभिनेता सुशांतच्या फोटोचा आधार घेतला गेला आहे.

सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण स्मिता पारीख यांनी पुस्तकाच्या पानाचा फोटो ट्वीट करुन लिहिले आहे की, “आणखी एका प्राथमिक बंगाली पुस्तकाने, आमच्या लाडक्या सुशांतचा फोटो, कुटुंब व वडिलांचे महत्त्व समजावण्यासाठी, पुस्तकात प्रकाशित केला आहे. मला त्यांचा अभिमान आहे. हे स्पष्ट आहे की, आपले शिक्षण मंडळसुद्धा त्याला उत्कृष्ट मानते.” स्मिताची पोस्ट चाहते जोरदार लाईक, कमेंट आणि रिट्विट करत आहेत. हे पाहून सुशांतचे चाहते, मित्र आणि कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.

सुशांतच्या फोटोला शालेय अभ्यासक्रमात जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याचा फोटो बांग्लाच्या प्राथमिक वर्गातील विज्ञान ग्रंथ, पुस्तकात वापरला गेला आहे. सुशांतच्या फोटोचा वापर, इयत्ता 3री मधील मुलांना मानव आणि प्राणी यांच्यातील, फरक स्पष्ट करण्यासाठी केला गेला आहे. माणसाच्या जागी अभिनेत्याचा फोटो लावून, मुलांना फरक सांगण्याचा प्रयत्न केला गेला. हे सुशांतच्या चाहत्याने ट्वीट केले की, ‘एसएसआरचे चित्र मानवतेचे उदाहरण आहे.’

सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनानंतर असे वृत्त येताच, त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. थोड्या वेळातच या अभिनेत्याने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते. सुशांत हा आज आपल्यात नसला, तरीही तो अशा माध्यमातून चाहत्यांशी कायम जोडलेला असेल हे नक्की.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


Leave A Reply

Your email address will not be published.