सध्या सिनेसृष्टीतून एकापाठोपाठ एक धक्का देणाऱ्या बातम्यांचा ओघ सुरू झालाय. कारण सोमवारी (१७ जानेवारी) रात्री ‘थलायवा’ रजनीकांत यांचा जावई आणि सुपरस्टार धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणी केली होती. यानंतर आता दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांची मुलगीही तिच्या पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे वृत्त आहे.
का होतेय चर्चा?
चिरंजीवी (Chiranjeevi) यांची मुलगी श्रीजा (Sreeja) तिचा पती कल्याण देव (Kalyan Dev) याच्यापासून विभक्त होत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे आडनाव काढून टाकले. यानंतर ती तिच्या पतीपासून वेगळी झाल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. तरीही, आतापर्यंत कोणाकडूनही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
चिरंजीवी यांच्या मुलीने ‘हे’ ठेवले नवीन नाव
चिरंजीवी यांची मुलगी श्रीजाने इंस्टाग्रामवर आपले नाव श्रीजा कल्याणवरून थेट श्रीजा कोनिडेला (Sreeja Konidela) असे ठेवले आहे. श्रीजाला इंस्टाग्रामवर २ लाखांपेक्षाही अधिक फॉलोव्हर्स आहेत. तसेच तिने आतापर्यंत २२० हून अधिक पोस्ट केल्या आहेत. ती इंस्टाग्रामवर ४७८ व्यक्तींना फॉलो करते.
कुटुंब
चिरंजीवी यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मुलाचे नाव राम चरण असून तो अभिनेता आहे. तसेच त्यांच्या मुलींचे नाव सुष्मिता आणि श्रीजा आहे. श्रीजाने गिरीष भारद्वाजसोबत २००७ साली गुपचूप संसार थाटला होता. परंतु दोघांचे नाते बिघडू लागले. श्रीजाने गिरीषवर हुंडा मागण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर दोघांनीही २०११ साली घटस्फोट घेतला. त्यानंतर श्रीजाने कुटुंबाच्या मर्जीने २०१६ साली ज्वेलरी बिझनेसमन कल्याण यांच्यासोबत लग्न केले.
पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेताना पोस्टमध्ये काय म्हणाला धनुष?
धनुषनं त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय की, “१८ वर्षांचा सहवास, मैत्री, प्रेम, पालकत्व आणि एकमेकांचा आधार. सोबत प्रगती, समजूतदारपणा, आणि एकमेकांशी जुळवून घेणं आणि त्यातून निर्माण होणारा समंजसपणा, असं हे आमचं नातं होतं. आज आम्ही अशा जागेवर उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वतःला शोध घेण्याचा प्रयत्न करू. कृपया आमच्या निर्णयाचा तुम्ही मान ठेवा आणि आम्हा दोघांनाही यातून बाहेर पडण्यासाठी थोडासा वेळ द्या.”
OM NAMASHIVAAYA ???????????? pic.twitter.com/XXFo8BDRIO
— Dhanush (@dhanushkraja) March 23, 2021
अशीच पोस्ट ऐश्वर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती.
दुसरीकडे ऐश्वर्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर अशीच पोस्ट शेअर केली आहे. तिने आपली पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “कॅप्शनची काही गरज नाहीये. फक्त तुम्ही समजून घ्यावे आणि तुमचे प्रेम याचीच गरज आहे.”
हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला
ऐश्वर्याच्या या पोस्टला १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ५ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. तिचा कमेंट बॉक्स पाहिला, तर आपल्याला समजेल की, त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना किती मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा-