Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

फ्लॉप चित्रपटांचा फटका! अक्षय कुमार- टायगर श्रॉफच्या मानधनात ‘इतकी’ घट

बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार (akshay kumar) आणि टायगर श्रॉफ (tiger shroff) आजकाल त्यांचे चित्रपट अयशस्वी झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर त्यांच्या यशाची वाट पाहत आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ आणि टायगर श्रॉफचा चित्रपट ‘हिरोपंती २’ वाईटरित्या फ्लॉप झाल्यापासून, दोन्ही कलाकारांच्या चित्रपटांच्या कामगिरीवर त्यांच्या फीवर परिणाम झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अक्षय आणि टायगरने त्यांच्या आगामी चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँसाठी फी कमी केल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाचे निर्माते जॅकी भगनानी (jackky bhagnani) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सर्व बातम्या बिनबुडाच्या असल्याचे सांगत जॅकीने सर्वांना सत्य समोर आणले आहे. फी कपातीच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जॅकीने ट्विट केले आणि लिहिले की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी निश्चितपणे विश्वासार्ह निर्माता असेल. नेहमी ट्रॅकवर असलेल्या अ‍ॅक्शन पॅक्ड स्फोटासाठी सज्ज व्हा.”

विशेष म्हणजे, अली अब्बास जफर (Jafar Abbas) दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूक ८ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या या लूकमध्ये अक्षय (Akshay kumar) आणि टायगर (tiger shroff) अ‍ॅक्शन अवतारात दिसले. मात्र, नंतर जेव्हा या चित्रपटाविषयी कोणतीही माहिती समोर आली नाही, तेव्हा चित्रपट कोल्ड स्टोरेजमध्ये गेल्याचे लोकांना वाटले. पण आता या ट्विटद्वारे अभिनेत्याने स्पष्ट केले आहे की हे दोन्ही कलाकार लवकरच या पडद्यावर थिरकताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘चित्रपट आला की याला देशभक्ती आठवते’, म्हणत अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, पाहा काय आहे प्रकरण

शस्त्र परवान्यानंतर भाईजानने खरेदी केली बूलेटप्रूफ कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

बाबो! रणवीर सिंग झालाय समंथावर फिदा; म्हणतोय, ‘तिच्यासोबत भविष्यात…’

हे देखील वाचा