‘चित्रपट आला की याला देशभक्ती आठवते’, म्हणत अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, पाहा काय आहे प्रकरण

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अक्षयचा हा बहुचर्चित चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सध्या अक्षय कुमार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. परंतु रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारने त्याचा डिपी बदलल्यानेही मोठा वाद सुरू झाला आहे.  काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत सोशल मीडियावर त्यांचे डीपी बदलून देशाच्या तिरंगी झेंड्याचे फोटो लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी नरेंद्र मोदी यांचे आवाहन स्विकारुन आपले डिपी बदलले होते. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्या ट्विटर अकाउंटचा डिपी बदलून तिरंगा लावला होता. त्याचबरोबर अक्षय कुमारने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे तसेच गर्वाने तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. परंतु या आव्हानानंतर अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला असून त्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अक्षय कुमारच्या या व्हायरल ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अक्षय कुमारने भितीपोठी हा डिपी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका युजरने प्रतिक्रिया देताना “बघा आता चित्रपट यायच्या आधी देशभक्ती आठवली,” असे म्हणत अक्षय कुमारची खिल्ली उडवली आहे. तर आणखी एकाने “तुम्ही रक्षाबंधन सारखे हिंदू धर्माविरोधी चित्रपट बनवता.तुम्हाला फक्त चित्रपटातून पैसा कमवायचा असतो,” असे म्हणत अक्षय कुमारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान अभिनेता अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला विरोध होण्याचे प्रमूख कारण म्हणजे या चित्रपटाची कथा कनिका ढिल्लोने लिहली आहे. आणि या कनिका ढिल्लोचे सगळे ट्विट हे हिंदूविरोधी असतात असा नेटकऱ्यांचा आणि सिनेमा प्रेमींचा आरोप आहे.

हेही वाचा –

शस्त्र परवान्यानंतर भाईजानने खरेदी केली बूलेटप्रूफ कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

बाबो! रणवीर सिंग झालाय समंथावर फिदा; म्हणतोय, ‘तिच्यासोबत भविष्यात…’

‘या’ अभिनेत्याने उडवली होती राजेश खन्ना यांची झोप, १०० चित्रपट करूनही मिळाले नाही यश

 

Latest Post