तुम बिन चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या प्रियांशचं पुढे झालं तरी काय? आज नक्की करतोय तरी काय?


तुम बिन या चित्रपटातून रातोरात स्टार झालेला प्रियांशु चॅटर्जी हा अभिनेता. असं म्हणतात की बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत टिकून राहणे हे आव्हानच आहे. आपले नशीब आजमावत असताना काही जण येथे हिट ठरतात तर काही फ्लॉप. आणि असाच एक अभिनेता म्हणजे प्रियांशु चॅटर्जी. आज त्याचा वाढदिवसानिमित्त आपण आज त्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या फारशा कुणाला माहित नाही.

तुम बिन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार सुरवात करणारा प्रियांशु. हा कलाकरा कधी आला आणि कधी गायब झाला हे चाहत्यांना कळलं सुद्धा नाही. सन २००१ मध्ये त्याने तुम बिन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रियांशु आणि सिंदली सिन्हाची रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटात राकेश वरिष्ठ देखील प्रमुख भूमिकेत होता. परंतु हिमांशुच्या या चित्रपतील लूकवर हजारो तरुणी भाळल्या होत्या. केवळ चित्रपट नव्हे तर चित्रपटांच्या गाण्यांनी सुद्धा अक्षरशः वेड लावले होते.

तुम बिन चित्रपटानंतर तो ऐश्वर्या राय सोबत ‘दिल का रिश्ता’ या सिनेमात देखील दिसला, पण या चित्रपटाचा त्याच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर अमिताभ बच्चन सोबत भूतनाथ या चित्रपटात देखील त्याने काम केले होते, परंतु त्याला आपली चमक दाखवता आली नाही. त्याचे एका मागे एक चित्रपट धडाधड आपटत गेले. जसे काही त्याच्या अभिनेता कारकिर्दीला जणू ग्रहणच लागल्यासारखे झाले होते. नंतर तो अनेक चित्रपटांत दिसत राहिला परंतू छोट्या छोट्या भूमिकांपर्यंतच मर्यादित राहिला.

Screengrab: Youtube/Priyanshu chaterjee

एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता की,” माझा हा पहिला सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच्या निर्मात्याने देखील खूप पैसे कमावले होते. चित्रपटासाठी मला प्रसिद्धी देखील मिळाली. पण खास गोष्ट अशी आहे कि ‘तुम बिन’ या चित्रपटासाठी मला तितके पैसे मिळाले नाहीत, जितके एका लोकप्रिय सिनेमाला मिळतात. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर माझं रिक्षामधून जाणे देखील मुश्किल झाले होते. माझे चाहते हे सतत बघण्यासाठी आणि स्पर्श करण्यासाठी आजूबाजूला वावरत असे.”

प्रियांशुच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, १९९७ मध्ये त्याने मॉडेल मालिनी शर्मा सोबत लग्न केले. पण लग्नाच्या चार वर्षानंतर २००१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मालिनी ही देखील अभिनेत्री आहे, जीने राज या चित्रपटात भूतनीची भूमिका केली होती.

प्रियांशु सध्या मुंबईत राहतो. मॉडेलिंग व छोट्या मोठ्या भूमिकांमधून पैसा कमवत असतो. तब्बल ४१ सिनेमांत काम केलेल्या प्रियांशुला एक-दोन चित्रपट सोडले तर कधीही मोठ्या किंवा मुख्य भूमिका मिळाल्या नाहीत. २०२०मध्ये शिकारा या हिंदी चित्रपटात शेवटचा दिसला.

 


Leave A Reply

Your email address will not be published.