Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड कौतुकास्पद! पर्वतारोही उमा सिंगने सोनू सूदला केला विजय समर्पित; म्हणाला, ‘खऱ्या आयुष्यातील हीरोला पहिल्यांदाच भेटलो आणि…’

कौतुकास्पद! पर्वतारोही उमा सिंगने सोनू सूदला केला विजय समर्पित; म्हणाला, ‘खऱ्या आयुष्यातील हीरोला पहिल्यांदाच भेटलो आणि…’

कोरोना महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले असल्यामुळे, देशातील अनेक नागरिक बेरोजगार झाले. अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. या सर्व अडचणींच्या काळी अभिनेता सोनू सूदने अनेकांना मदतीचा हात देऊन, त्यांच्या मनात स्वतः चे एक वेगळे स्थान निर्माण केले. सोनूच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक जणांनी त्याला प्रेरणास्थानी ठेवुन जोमाने कामाला सुरुवात केली आहे. अशाच एक सोनूच्या चाहत्याने आपल्या पराक्रमचे श्रेय त्याला दिले आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील पर्वतारोही आणि सायकलपटू उमा सिंगने रविवारी १५ ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर, माउंट किलीमांजारोवर चढून आपल्या पराक्रमचे श्रेय अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूदला समर्पित केले आहे. २५ वर्षीय उमाने किलीमांजारोच्या पहिल्या बेस पॉईंटवर सायकल चालवली आणि नंतर वर गेला. शिखरावर पोहोचल्यानंतर त्याने सोनू सूदचे पोस्टर उघडले, ज्यात लिहिले होते, ‘भारताचा खरा हीरो’.

उमाने आपले सर्व श्रेय अभिनेता सोनूला समर्पित केले आणि म्हणाला की, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी खऱ्या आयुष्यातील हीरोला भेटलो आहे आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा होती. ते आपल्या देशासाठी कठीण परिस्थितीत उभे राहिले, मग त्यावेळी त्यांनी स्वतः च्या जीवाचीही पर्वा केली नाही. तुम्ही भारतातील सर्वांचे मोठे बंधू आणि सर्वात उत्तम अभिनेता आहात.”

उमाच्या या कर्तुत्वाचे अभिनंदन करत सोनूने  प्रतिउत्तर दिले आहे. सोनू म्हणाला की,“मला उमाचा खूप अभिमान आहे, की त्याने प्रचंड मोठा खडतर प्रवास करून स्वःताला सिद्ध करुन दाखवले आहे. त्याची मेहनत आणि चिकाटीमुळे तो इतका मोठा पराक्रम यक्षस्वी करु शकला.  मी त्याच्या या यक्षस्वी पराक्रमावर खूप प्रभावित झालो आहे. तो आपल्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. खूप खूप अभिनंदन उमा आणि तुझ्या या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद.”

 

शिवाय सोशल मीडियावर सर्वत्र उमाचे भरभरून कौतुक केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा