Tuesday, April 23, 2024

‘पोन्नियन सेल्वन 2’च्या प्रमोशन दरम्यान आली ऐश्वर्याला सलमानसोबतच्या ‘या’ सिनेमाची आठवण म्हणाली…

बॉलिवूडमधील ब्युटी विथ ब्रेन असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय. बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश अगदी प्रकर्षाने केला जातो. हिंदीसोबतच साऊथमध्ये देखील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ऐश्वर्याचा लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवले. आता दुसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सध्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ऐश्वर्या व्यस्त आहे. याच दरम्यान तिने ‘हम दिल दे चुके सनम’पासून ते ‘पोन्नियिन सेल्वन 2’पर्यंत तिच्या ‘नंदिनी’च्या भूमिकेबद्दल खुलेपणाने चर्चा केली. सोबतच ती ‘पीएस-1’ आणि ‘पीएस-2’ मध्ये नंदिनी ही भूमिका ऐकून किती खुश झाली हे सांगितले.

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सांगितले की, “जेव्हा मला मणी गुरु यांनी सिनेमाची कथा ऐकवली आणि सांगितले की, तू ‘नंदिनी’ भूमिका साकारणार आहे, तेव्हा मला वाटले खरंच त्यावर मणी गुरु यांनी मन हलवत होकार दिला होता. मी त्यांची आभारी आहे, की त्यांनी मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. हा अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर, अविस्मरणीय होता.”

पुढे ऐश्वर्याने या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले, “हम दिल दे चुके सनम मधली नंदिनी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मी खूप आभारी आहे की मला ती नंदिनीची भूमिका करायला मिळाली. ती भूमिका माझ्यासाठी, संजय सरांसाठी आणि प्रेक्षकांसाठी कायमच खास ठरली आहे. आता मणि सरांच्या पोन्नियन सेल्वन सिनेमात मला नंदिनी हीच भूमिका पुन्हा करायला मिळाली. मला अशा सशक्त स्त्रियांची भूमिका साकारायला मिळणे हा एक मोठा आशीर्वाद आहे आणि मी खूप खूप आभारी आहे.”

ऐश्वर्याला आपला लकी चार्म म्हणताना मणी रत्नम म्हणाले, “मी तिला तेव्हाच विचारतो जेव्हा मला वाटते की ती त्या भूमिकेसाठी योग्य आहे. ती मला एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटली की प्रेक्षकही मला त्याची पोचपावती तिच्या भूमिकेवर प्रेम करून देतात. ऐश्वर्या माझा लकी चार्म आहे. ” दरम्यान ऐश्वर्या राय अभिनित ‘पोन्नियन सेल्वन 2’ सिनेमात त्रिशा, प्रकाश राज, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाला, जयराम, प्रभू, लाल आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका असून, हा सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा