Wednesday, April 29, 2026
Home बॉलीवूड दहा वर्षांपूर्वीच रणबीरने ऐश्वर्यासोबत काम करण्याचं पाहिलं होतं स्वप्न, ‘ए दिल है मुश्किल’मधून झाली स्वप्नपूर्ती

दहा वर्षांपूर्वीच रणबीरने ऐश्वर्यासोबत काम करण्याचं पाहिलं होतं स्वप्न, ‘ए दिल है मुश्किल’मधून झाली स्वप्नपूर्ती

अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या  दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकात ऐश्वर्याच्या अभिनयाने प्रत्येकालाच वेड लावले होते. या चित्रपटाच्या यशांनीच ऐश्वर्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली होती. पण अलिकडच्या काळातंही तिच्या ‘ए दिल है मुश्किल’मधील तिची आणि रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) जोडीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. पण यांच चित्रपटाआधी रणबीरच्या मनात ऐश्वर्यासोबत काम करण्याची इच्छा तयार झाली होती. पाहूया त्यांच्या याच बद्दलचा एक  रंजक किस्सा .

त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्याने अनेक अभिनेत्यांसोबत उत्तम केमिस्ट्री पडद्यावर सादर केली आहे पण ‘ऐ दिल है मुश्किल’मधली तिची रणबीर कपूरसोबतची केमिस्ट्री आजही लक्षात आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत काम करणे हे रणबीरचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. या चित्रपटात करण जोहर जोडीच्या भूमिकेत दिसला होता, पण वर्षांपूर्वी जेव्हा रणबीरने ऐश्वर्यासोबत पहिल्यांदा काम केले होते, तेव्हाच तिच्या विरुद्ध अभिनेता बनण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती.

रणबीर कपूर आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक बनला असेल, परंतु अभिनय करण्यापूर्वी त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट 1999 मध्ये बनला होता. ‘आ अब लौट चलें’च्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर दहावीत होता आणि बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीरचा निकालही लागला आणि ऐश्वर्यानेही या आनंदात झालेल्या पार्टीला हजेरी लावली होती. ऐश्वर्यासोबत काम करून रणबीर इतका प्रभावित झाला की या चित्रपटाच्या लेखिकेला त्याने १० वर्षाआधीच याबद्दलचा प्रश्न विचारला होता.

रुमी जाफरीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “एक दिवस रणबीर माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याची ऐश्वर्यासोबतची जोडी पडद्यावर कशी दिसेल. मी माझा कॅमेरा उचलला आणि त्याचा ऐश्वर्यासोबतचा फोटो काढला, पण तेव्हा मला माहित नव्हते की 17 वर्षांनंतर ही सुंदर जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.” ‘ऐ दिल है मुश्किल’मधली रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की दोघांमध्ये जवळपास 9 वर्षांचा फरक आहे याचा अंदाज लावणं कठीण होतं.

हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा रणबीर आणि ऐशच्या रोमँटिक स्टाइलची सर्वाधिक चर्चा झाली होती. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने स्वतः सांगितले होते की, ‘ऐश्वर्यासोबत एक इंटिमेट सीन शूट करताना तो इतका नर्व्हस झाला होता की त्याचे हात थरथरू लागले होते, अॅशच्या गालाला स्पर्श करूनही नर्व्हस होत होते. रणबीरची अवस्था पाहून ऐश्वर्याने त्याला आराम दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा