Saturday, August 8, 2026
Home बॉलीवूड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल लखनऊत, मुख्यमंत्री योगींची घेतली भेट

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल लखनऊत, मुख्यमंत्री योगींची घेतली भेट

अभिनेते सनी देओल आणि प्रिती झिंटा सध्या त्यांच्या आगामी ‘बटवारा 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. तर आता नुकतेच सनी देओल आणि प्रितीने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी लखनऊला गेले होते. त्यावेळीस त्यानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. हि भेट त्यानी शासकीय नीवास्थानी घेतली भेटीनंतर मुख्यंमंत्री योगी दोन्ही कलाकारांना हिंदु देवतांच्या मुर्ती भेट दिल्या आहेत. तसेच त्यानी एकत्र फोटो काढले. त्यांचे हे फोटो सनी देओलने सोशल मिडीयावर शेअर केले आहे. 

बटवारा 1947 च्या प्रदर्शनापुर्वी सना देओल आणि प्रिती यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्याच्यांशी भेटुन मला खूप आनंद झाला. त्यांच्याशी माझा खूप सुखद आणि सौहार्दपूर्ण संवाद झाला. असे सनी देओलने त्याच्या पोस्ट मध्ये लिहले आहे. 

सनी (sunny)देओल आणि प्रिती झिंटा त्यांच्या आगामी ‘बटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लखनौमध्ये आले होते, जिथे सनीचा मुलगा करण देओलही उपस्थित होता. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात, 14 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची स्पर्धा इम्रान हाश्मीच्या ‘अवारपन 2’ शी असेल. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरतो पाहण्यासारखे राहील.

‘ओह माय डॉग’च्या स्क्रीनिंगदरम्यान रवीनावर झेपावला डॉगी, पण अभिनेत्रीने यावर दिलेल्या रिएक्शनने जिंकली चाहत्यांची मने

 

हे देखील वाचा