Tuesday, June 18, 2024

एकदा चक्क विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या रायने ३० लोकांना वाढले होते जेवण, विशाल दादलानीने सांगितला किस्सा

जगातली सर्वात सुंदर महिला म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय तिच्या नितळ आणि अतिशय सुंदर सौंदर्यामुळे ओळखली जाते. ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री आहे. ती तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांवर आणि समीक्षकांवर प्रभाव टाकण्यास यशस्वी होते. ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट व्यक्ती देखील आहे. प्रेक्षकांचा नेहमीच कलाकारांबद्दल एक गैरसमज असतो. कलाकरांना गर्व असतो, ते रूड वागतात आदी अनेक समजुती लोकांमध्ये असतात. मात्र प्रत्यक्षात असे अजिबातच नसते. याशिवाय प्रत्येक स्त्रीला वाटत असेल की ऐश्वर्या एवढी मोठी अभिनेत्री आहे ती घरातले कोणतेच काम करत नसेल, मात्र असे अजिबात नाहीये. ऐश्वर्या सामान्य स्त्रियांसारखीच गृहकृत्यदक्ष देखील आहे. असच एक किस्सा संगीतकार, गायक विशाल दादलानीने नुकताच सर्वांना सांगितला.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लाडका शो असणाऱ्या ‘सारेगामापा’ शोमध्ये नुकतीच अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंग यांनी हजेरी लावली. ते त्यांचा आगामी ‘बॉब बिस्वास’ सिनेमा प्रमोट करण्यासाठी आले होते. यावेळी सूत्रसंचालक आदित्य नारायणाने अभिषेकला विचारले की, ऐश्वर्या घरात काम करते का? या प्रश्नावर लगेच विशालने उत्तर देण्यास सुरुवात केली आणि एक किस्सा सर्वांना सांगितला.

विशाल म्हणाला की, “एकदा मी, ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन एका टूरला गेलो होतो. या टूरला ३० लोकं उपस्थित होते. एकदिवस सर्व लोकांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत डिनर घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मिस्टर बच्चन यांनी ही इच्छा मान्य केली आणि आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो. त्याचवेळी तिथे अजून एक ग्रुप आला आणि त्यांनी देखील त्यांच्यासोबत जेवण जेवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तेव्हा वेटर्ससाठी तिथे खूपच जास्त लोकं होते, या वाढीव लोकांमुळे वेटर्सवर देखील खूप लोड आला ते पाहून ऐश्वर्या उभी राहिली आणि तिने स्वतः वाढायला सुरुवात केली. खरंतर ऐश्वर्याला असे काही करायची गरज नव्हती, तरी तिने स्वतःहून सर्वांना वाढले. तिथे कोणताही कॅमेरा नव्हता. किंवा तिने हे कोणत्याही पब्लिसिटीसाठी केली नाही तर प्रेम मिळवण्यासाठी केले. सर्वांचे जेवण झाल्यानंतर तिने सर्वांना गोड देखील खाऊ लागते. त्यांनतर ती जेवायला बसली.”

यावर अभिषेकने सांगितले की, “ऐश्वर्या बेस्ट आहे. तिची नाळ नेहमी जमिनीशी जोडलेली असते. तिला भारतीय संस्कार देखील उत्तम माहित आहे. आता ती तेच संस्कार आमच्या मुलीला देत आहे.” अभिषेक ऐश्वर्याने २००७ साली मुंबईमध्ये लग्न केले. त्यानंतर २०११ साली त्यांच्या मुलीचा आराध्याचा जन्म झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा