Monday, July 15, 2024

फ्लॉप चित्रपटांनी लागली होती अजयच्या करिअरला उतरती कळा मात्र ‘या’ सिनेमांमधून केले सिंघमने जोरदार कमबॅक

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या मेहनतीवर आणि चिकाटीच्या जोरावर नाव कमावलेले अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत, मात्र या सर्व कलाकारांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने, आकर्षक व्यक्तीमत्वाने आणि दमदार ऍक्शनने सर्वांची मने जिंकणारा अजय देवगण नेहमीच वेगळा ठरला. आज यशाच्या शिखरावर असणाऱ्या अजयने अतिशय कष्टाने एवढे यश मिळवत सुपरस्टार पर्यंतचा प्रवास केला आहे. मात्र या प्रवासात त्याने अनेक चढउतार पाहिले मात्र तेव्हाच काही सिनेमे तारणहार बनून आले आणि त्याचे करिअर सांभाळले. आज (२ एप्रिल) अजय त्याच्या ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या काही चित्रपटांबद्दल ज्यांनी त्याचे करिअर सावरले.

एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठे नाव कमावले आहे. त्याला त्याच्या चित्रपटांसाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्याला त्याच्या हिट चित्रपटांनी आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान दिले. मात्र अजयच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली जेव्हा त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटत होते. हा काळ त्याच्यासाठी खूपच कठीण होता. सतत येणारे अपयश त्याच्या करिअरसाठी घटक ठरत होते, मात्र अजयने हार मानली नाही, त्याने त्याच्या प्रयत्नांनी पुन्हा यश मिळवले आणि सुपरस्टार म्हणून स्वतःला सिद्ध केले.

अजयने ‘फुल और कांटे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या सिनेमामुळे अजय एका रात्रीत ऍक्शन हिरो म्हणून नावारूपास आला. त्यानंतर त्याने ‘जिगर’, ‘दिलवाले’, ‘दिलजले’ आदी सिनेमे प्रदर्शित झाले, मात्र त्यानंतर त्याचे सर्वच सिनेमे फ्लॉप व्हायला लागले. त्याच्या करिअरच्या दृष्टीने २००४ हे साल खूपच वाईट मानले जाते. त्यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘युवा’, ‘रेनकोट’ सिनेमे देखील काही खास कमाल दाखवू शकले नाही. २००५ साल उजाडले त्यावर्षी ‘इंसान’, ‘ज़मीर’, ‘टॅंगो चार्ली’, ‘काल’, ‘मैं ऐसा ही हूं’ आणि ‘ब्लॅकमेल’ हे सिनेमे देखील फ्लॉप ठरले.

सतत फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अजयसाठी ही धोक्याची घंटा होती. त्याच्या करिअरचा ग्राफ उतरायला लागला. मात्र त्याने प्रयत्न सोडले नाही. पुढे त्याचा ‘गोलमाल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. या सिनेमाने तो एक कॉमेडी हिरो म्हणून सर्वांसमोर आला. ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘ऑल द बेस्ट’, ‘अतिथि तुम कब जाओगे’, ‘राजनीति’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘राजनीति’ आणि ‘गोलमाल 3’ आदी चित्रपटांनी अजयचे करिअर सावरले. फक्त ऍक्शन नाही तर कॉमेडी हिरो म्हणून देखील त्याला नवी ओळख मिळाली.

आजच्या घडीला अजय देवगण हा हिट चित्रपटांची ग्यारेंटी बनला आहे. त्याची प्रदर्शित झालेली ‘गोलमाल 3’, ‘रेड’, ‘टोटल धमाल’, ‘दे दे प्यार दे’ आदी सर्व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली. त्याचा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा ‘तन्हाजी द अनसंग वॉरियर’ हा त्याच्या करिअरमधील सर्वात यशस्वी आणि मोठा सिनेमा मानला जातो. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २७९ कोटींचा गल्ला जमवला होता. लवकरच अजयचा ‘रनवे 34’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अजयसोबत अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

फोटोमधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठी मनोरंजन मिरवतीये अभिनयाचा डंका

इटलीच्या अडल्टस्टारची प्रियकराने शरीराचे तुकडे करून केली निर्घृण हत्या, घटनाक्रम ऐकूण उडेल थरकाप

हे देखील वाचा