इटलीच्या मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून जानेवारी महिन्यापासून गायब असलेल्या इटलीच्या अडल्ट स्टारची निर्घुण हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. या बातमीने इटलीच्या मनोरंजन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कैरोल माल्टेसी (carol maltesi) असे या अडल्ट स्टारचे नाव असून तिची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याने हा गुन्हा कबुल केला आहे. यावेळी अनेक धक्कदायक बाबी या मारेकऱ्याने सांगितल्या असून कोणाचाही थरकाप उडेल अशाच प्रकारे ही हत्या करण्यात आली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, कैरोल माल्टेसी ही इटलीची प्रसिद्ध अडल्ट स्टार जानेवारी २०२२ पासून गायब होती. पोलिस तिचा सर्वत्र तपास करत होते मात्र ती कुठेही सापडत नव्हती. याचवेळी १६ मार्चला कैरोल माल्टेसीच्या मृतदेहाचे तुकडे एका समुद्रकिनारी सापडले होते, यावेळी हा मृतदेह तिचाच आहे हे कोणालाही माहित नव्हते. मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे एका चाहत्याने हा मृतदेह ओळखला आणि हे सगळे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास करण्यातही पोलिसांना यश आले असून त्यांनी मारेकऱ्याला पकडले आहे. तिच्या प्रियकरानेच तिची निर्घुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्हाही त्याने कबूल केले आहे.
यावेळी कैरोल माल्टेसीच्या मारेकऱ्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने ही हत्या १० ते १२ जानेवारीच्या दरम्यान केला असल्याची कबूली दिली आहे. अत्यंत क्रुरपणे हत्या करुन त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तुकडेही केले होते. हे सगळे तुकडे करुन त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. त्यानंतर काही दिवसानी त्याने हे तुकडे एका रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. अत्यंत थंड डोक्याने त्याने या संपुर्ण घटनेचा उलघडा केला आहे.तसेच दिशाभुल करण्यासाठी तो तिच्या आईला मेसेजही करत असल्याची बाब समोर आली आहे. हे भयाणक कृत्य करणाऱ्या तिच्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- असे आहे ‘आरआरआर’ चित्रपटाच्या यशामागचे राजकारण, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
- ‘मेला’ चित्रपटातील फैजल खान आठवतो का? पाहून ओळखणे देखील होईल कठीण
- ‘या’ गोष्टीमुळे शाहिद कपूरला अनावर झाला राग, पाहून आजूबाजूचे लोक लागले घाबरू, पाहा व्हिडिओ