Wednesday, June 26, 2024

कपिल शर्माच्या मुलावर अजय देवगणने केला विनोद; कॉमेडियननेही दिले मजेशीर प्रत्युत्तर

कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ची प्रतीक्षा आता संपली आहे. २१ ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्याच आठवड्यातील एपिसोडमध्ये अजय देवगण आणि अक्षय कुमार दिसणार आहेत. ते दोघेजण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील. अजय त्याच्या रिलीझ झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे, तर अक्षय कुमार त्याच्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.

शोच्या निर्मात्यांनी अजय देवगणच्या एपिसोडचा एक जबरदस्त प्रोमो रिलीझ केला आहे, ज्यामध्ये तो कपिल शर्माची मजा घेताना दिसत आहे. अजय कपिल शर्माचा शो बंद झाल्याबद्दल आणि दुसऱ्यांदा वडील होण्याबद्दल विनोद करतो. यावर कपिल शर्मा लाजतो आणि काही काळ शांत राहतो. मग तो अजयच्या चित्रपटाबद्दल असे काही सांगतो की, अर्चना पूरन सिंग तिच्या तोंडावर हात ठेवून हसते, तेव्हा अजयही हसायला लागतो.

व्हिडिओमध्ये अजय देवगण कपिलला विचारतो, “तुझा शो जानेवारी महिन्यात बंद झाला होता ना?” त्यावर कपिल म्हणतो की, “हा हंगाम जानेवारीत बंद झाला होता. यावर अजय स्पष्ट बोलतो की, “आणि फेब्रुवारीमध्ये तुमचे मूलही जन्माला आले?” यावर कपिल म्हणतो, “हे उत्पादन फेब्रुवारीमध्ये रिलीझ झाले नव्हते, शूटिंग ९ महिने चालू होती.”

कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती देखील या सिझनमध्ये परतत आहे. अलीकडेच सुमोनाने ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’च्या टीमसोबत शूट केले. आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या शैलीत दिसली आहे.

अर्चना पूरन सिंग देखील टीमसोबत या शोमध्ये पुनरागमन करत आहे, पण तिच्या व्यक्तीरेखेमध्ये एक मोठा ट्विस्ट दडलेला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती सुमोनाचे पात्र साकारणार आहे. “जर तुम्हाला असे वाटत असेल की, सुमोना शोचा भाग नाही, तर तुम्हाला मोठे आश्चर्य वाटणार आहे. सुमोना या शोचा एक भाग आहे, पण ती आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या रुपात दिसणार आहे.”

‘द कपिल शर्मा शो’चा हा तिसरा सीझन आहे. यामध्येही पूर्वीप्रमाणेच मजेशीर एपिसोड पाहायला मिळतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा