Monday, April 15, 2024

अजितदादांच्या हस्ते ‘आठवणी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही

आगामी ‘आठवणी’ ( Aathvani ) या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अजितदादा व इतर मान्यवरांची भेट घेतली. यावेळी अजितदादांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या व भविष्यात असे उत्तमोत्तम चित्रपट येवोत अशी इच्छा व्यक्त केली.

सिद्धांत अशोक सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारी ही कथा आहे. त्यामुळे आजची तरूणाई आणि वयस्कर असे सगळेच या चित्रपटाच्या आठवणीत रमून जातील. ( Ajit Pawar launch poster of Marathi movie Aathavani )

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते.

त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट 7 जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

अधिक वाचा –
– मराठमोळ्या ‘या’ अभिनेत्रीने घातले 108 वेळा सुर्यनमस्कार; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
– पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा