Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अंतरा माळी ही मागील अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून गायब आहे. तिने ‘ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असल्याने अनेकजण तिच्या बाबतीत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (Bollywood actress Antara Mali leaved film industry, let’s know what she doing now)

टॅलेंट, बोल्ड आणि उत्कृष्ट अभिनय या सर्वात पारंगत असलेली अंतरा जेव्हा चित्रपटसृष्टीपासून लांब गेली, तेव्हा ही गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप हैराण करणारी होती. पण तिचे असे अचानक गायब होणे. यामागे एक कहाणी दडलेली आहे. 2010 पर्यंत बॉलिवूडमध्ये आघाडीचे स्थान मिळवलेली अभिनेत्री अशी अचानक गायब झाली त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंतरा माळीने 2002 मध्ये ‘रोड’ आणि 2004 मध्ये ‘नाच’ यांसारख्या चित्रपटात बोल्ड परफॉर्मन्स दिला होता. 12 वर्षाच्या करिअरमध्ये तिने 12 चित्रपटात काम केले. पण तिचा एकही चित्रपट हिट झाला नाही.

सध्या अंतरा, तिची मुलं आणि पती कुरियन यांच्यासोबत आणि लाईमलाईटपासून दूर शांततेत आयुष्य जगत आहे. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याला या ग्लॅमरपासून दूर ठेवले आहे. ती तिचा पूर्ण वेळ तिच्या परिवाराला देते.

अंतराने तिच्या करिअरमध्ये ‘प्रेमकथा’, ‘मस्त’, ‘डरना’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अंतरा ही दिग्दर्शक राम गोपाल वर्मां यांची आवडती अभिनेत्री होती. परंतु राम गोपाल वर्मां यांच्या कंपनीमधून तिला जास्त ओळख मिळू शकली नाही.

अधिक वाचा-
– दहा वर्षात एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही रिया चक्रवर्ती, सुशांत व्यतिरिक्त ‘या’ वादातही अडकलीय अभिनेत्री
‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘मी घाबरायचे आणि…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा