मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट, ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’. या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्रं अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.
आर्ची आणि परश्याची ही सुपरहिट जोडी कमबॅक करण्याची चर्चा रंगली आहे. आकाश ठोसरने काही वेळापूर्वी त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्यासोबत स्टनिंग अंदाजात रिंकू दिसत आहे.
https://www.facebook.com/100044214320181/posts/383849289765545/?sfnsn=wiwspwa
आकाशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने मिरर सेल्फी शेअर केली आहे. यामध्ये आकाशने लाल रंगाची हुडी आणि जीन्स परिधान केली आहे. तर रिंकूने देखील राखाडी रंगाचा टॉप आणि आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Akash thosar share a photo on Facebook with actress Rinku rajguru)
त्यांचे चाहते या फोटोवर अनेक कमेंट करून त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. तसेच ते कोणत्या नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत का?? अशी चर्चा रंगू लागली आहे. हा फोटो शेअर करून केवळ एकच तास झाला आहे. या फोटोला आतापर्यंत ४ हजारपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आकाशने ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘झुंड’, ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केले आहे. तर रिंकूने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा
-कृष्णा श्रॉफचा टॉपलेस फोटो पाहून दिशा पटानीही झाली हैराण; प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘तुझी बॉडी…’
-मुलगा करणला सनी देओल देत नाही कोणताच सल्ला; पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर एकटा पडला होता अभिनेता