कृष्णा श्रॉफचा टॉपलेस फोटो पाहून दिशा पटानीही झाली हैराण; प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘तुझी बॉडी…’


बॉलिवूडमध्ये स्टारकिड ग्लॅमर बाबतीत खूप लोकप्रिय असतात. यातीलच फिटनेसबाबत लोकप्रिय असलेली स्टारकिड म्हणजे जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ. कृष्णा श्रॉफही तिचा भाऊ टायगर श्रॉफप्रमाणे फिटनेस प्रेमी आहे. दिवसातील किती तरी वेळ ती जिममध्ये घालवत असते. तिच्या भावाप्रमाणेच ती देखील एकदम फिट आहे. तिचे जिममधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिच्या एका फोटोने सोशल मीडियाचे तापमान अक्षरशः वाढवले आहे. 

अनेकवेळा बिकिनीमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या कृष्णा श्रॉफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका मॅगझिन कव्हरवरील दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कृष्णाने काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. तिच्या पँटचे एक बटण अनहुक केले आहे. केस मोकळे सोडले आहेत, तसेच तिने न्यूड मेकअप केला आहे. तसेच तिच्या बॉडीवर अनेक टॅटू देखील दिसत आहेत. तिचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

तिचा हा फोटो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने देखील कृष्णाच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. तिने लिहिले आहे की, “काय शानदार बॉडी आहे.” या सोबतच तिने एक फायर ईमोजी पोस्ट केली आहे. (Krishna Shroff share her topless photo from magazine cover photoshoot)

दिशा आणि कृष्णाची बॉंडिंग खूप चांगली आहे. कृष्णाने सांगितले होते की, दिशासोबत असताना ती खूप खुश असते. तसेच त्या दोघी खूप मस्ती करत असतात. दिशाच्या वाढदिवशी टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांनी तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचे हे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कृष्णाने काही दिवसांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओ मधून डेब्यू केला आहे. ‘किन्नी किन्नी वारी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्यासोबत जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर, जन्नत जूबैर, राज शोकर आणि तन्वी दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने सोडले मौन; सोशल मीडियाचा आधार घेत म्हणाली…

-बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर; बोल्डनेस पाहून चक्रावले नेटकरी

-बॉलिवूडमधील सख्ख्या बहिणी आता ऑनस्क्रीन दिसणार एकत्र? करिश्मा कपूरने फोटो शेअर करून दिली झलक


Leave A Reply

Your email address will not be published.