मुलगा करणला सनी देओल देत नाही कोणताच सल्ला; पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर एकटा पडला होता अभिनेता


बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण देओल याने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाबाबत लोकांना खूप अपेक्षा होत्या. पण एवढे प्रमोशन करून देखील प्रेक्षकांना हा चित्रपट काही खास पसंत पडला नाही. या गोष्टीचा स्वीकार स्वतः करणने देखील केला होता की, चित्रपटात काहीतरी कमी राहिली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त आवडला नाही. लॉकडाऊनदरम्यान करणने त्याच्यात असणाऱ्या कमतरतेवर काम केले आहे. 

करणने लॉकडाऊनदरम्यान ना केवळ त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी केली, तर पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही त्याने त्याच्यातील आत्मविश्वास कायम ठेवला आहे. हिंदुस्थान टाईम्ससोबत बोलताना करणने सांगितले की, “पहिल्या चित्रपटानंतर मला असेच सोडून दिले होते. माझे सगळे निर्णय मीच घेत असतो. कारण मला पप्पांनी सांगितले आहे की, माझे निर्णय आता मलाच घ्यावे लागतील. मलाच माझी जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या चुकांमधून मला शिकता आले पाहिजे.”

करण देओलने सांगितले की, लॉकडाऊनने त्याला त्याच्या करिअरबाबत त्या गोष्टींचा विचार करायला वेळ दिला आहे, जे त्याला करायचे आहे. करण म्हणाला की, “मी माझे चुलते (बॉबी देओल), आजोबा (धर्मेंद्र) आणि वडिलांसोबत होतो. मी माझे जुने व्हिडिओ पाहिले, जे मी शाळेत असताना केले होते. मी पाहिले की, मी किती खुश होतो तेव्हा! मी अभिनय करायला यासाठी सुरुवात केली कारण मला याची आवड आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होऊन देत नाही. त्यामुळे मी पुन्हा आत्मविश्वास कमावला आहे. त्यामुळे मी लॉकडाऊनमध्ये स्वतःला रिचार्ज केले आहे.” (Sunny Deol do not give any advise to his son karan deol)

धर्मेंद्र यांनी त्यांचा ‘अपने २’ या चित्रपटाची घोषणा करताना हे सांगितले होते की, या चित्रपटात करण देओल देखील दिसणार आहे. ‘अपने २’ या चित्रपटासाठी करणने बॉक्सिंगची ट्रेनिंग देखील घेतली आहे. त्याने सांगितले की, “मी कधीच हार मानणार नाही. माझ्या कुटुंबातील कोणीच मला हार मानायला शिकवले नाही. मी आधीपेक्षा जास्त मेहनत घेईल आणि मला जे आवडतं ते करेल.”

करणच्या या बोलण्यावरून असे वाटत आहे की, त्याच्या आगामी चित्रपटात तो फुल एनर्जीने आणि मेहनतीने उतरणार आहे. प्रेक्षक त्याच्या आगामी चित्रपटातील त्याची भूमिका बघण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने सोडले मौन; सोशल मीडियाचा आधार घेत म्हणाली…

-बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर; बोल्डनेस पाहून चक्रावले नेटकरी

-बॉलिवूडमधील सख्ख्या बहिणी आता ऑनस्क्रीन दिसणार एकत्र? करिश्मा कपूरने फोटो शेअर करून दिली झलक


Leave A Reply

Your email address will not be published.