‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु असून या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे रोजच समोर येत आहेत. राजच्या अटकेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली असून, या प्रकरणात काही लोक राज कुंद्राला दोषी करार देत आहेत, तर काही लोक त्याच्या समर्थानात बोलत आहेत. राजच्या विरोधात प्रसिद्ध यूट्यूबर असणाऱ्या पुनीत कौरने देखील तिला राजने एक व्हिडिओ बनवण्याची ऑफर दिली असल्याचा दावा केला आहे.

पुनीतने तिच्या इंस्टास्टोरीमध्ये काही फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिले की, “मित्रांनो तुम्हाला आमचा व्हेरिफाइड डीएम व्हिडिओ आठवत असेल ना? जिथे त्यांनी मला त्यांच्या हॉटशॉट्स ऍप्पसाठी काम करायचे सांगितले होते. मी तर मरूनच गेले.” पुनीतने अनेक बातम्यांची कात्रणं देखील पोस्ट केली आहेत. (Who exactly is Puneet Kaur who is accusing Raj Kundra?)

पुनीत कौर ही एक भारतीय – अमेरिकन मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे यूट्यूबवर कौर ब्युटी नावाचे चॅनेल देखील आहे. पुनीत एक मेडिकलची विद्यार्थिनी असण्यासोबतच एक यूट्यूबरसुद्धा आहे. ती उत्तर कॅलिफोर्नियामधील बे एरिया इथे राहते. तिने वेगवेगळे व्लॉग, ट्यूटोरियल, GRWM व्हिडिओ बनून इंस्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स मिळवले आहे. तर यूटुबवर तिचे २,७०,००० फॉलोवर्स आहे.

instagram punitkaurbeauty

सोबतच ती मेडिकलच्या देखील अभ्यास करत आहे. ती तिच्या भावांच्या मेडिकल स्कुल यूट्यूब चॅनेलची मेडब्रोस देखील आहे. या चॅनेलवर मेडिकल स्कुल संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहे. तिने तिच्या पुढच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “मला जेव्हा पहिल्यांदा हा मेसेज आला तेव्हा मला वाटले की, स्पॅम मेसेज असेल. हा किती खालच्या पातळीचा माणूस आहे. देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव.” सोबतच तिने राज कुंद्राबाबत अनेक स्क्रीनशॉट देखील पोस्ट केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने सोडले मौन; सोशल मीडियाचा आधार घेत म्हणाली…

बॉलिवूडमधील सख्ख्या बहिणी आता ऑनस्क्रीन दिसणार एकत्र? करिश्मा कपूरने फोटो शेअर करून दिली झलक

बिग बॉस फेम ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर; बोल्डनेस पाहून चक्रावले नेटकरी


Leave A Reply

Your email address will not be published.