Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी बिहारमधील अश्लिलता बंद करण्यासाठी अक्षरा सिंगणे ‘चौसठ जोगीनिया माई’च्या रुपात धारण केले रौद्र रूप

बिहारमधील अश्लिलता बंद करण्यासाठी अक्षरा सिंगणे ‘चौसठ जोगीनिया माई’च्या रुपात धारण केले रौद्र रूप

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग ही लोकप्रिय अभिनेत्री असून एक चांगली गायिका देखिल आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ही अभिनेत्री अभिनयासोबतच आपल्या गायिकासाठी देखिल ओळखली जाते. अक्षराच्या आगामी येणाऱ्या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दोन वर्षानी असा जल्लोष पहायला मिळत आहे, त्यामुळे प्रत्येकजनच नवरात्री खूपच उत्साहाने साजरा करत आहेत. अशातच भोजपुरीची सुप्रसिद्ध आभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंग( Akshara Singh)  देवीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच स्कंदमाता रुपाच्या दिवशी आपल्या नवीन गाणे ‘चौसठ जोगीनिया माई’चा टीझर प्रदर्शित केला आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रम अकाउंटवरुन या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.यासोबतच तिने भन्नाट कॅप्शनही दिले आहे, ज्यामुळे अक्षरा सिंग खूपच चर्चेत आली आहे.

कशी होती जोगीनिया माई गाण्याची शूटिंग
अक्षरा या अभिनेत्रीला आपल्या कामामध्ये हलगरजीपणा आजिबात आवडत नाही. ती आपले काम शिस्तप्रिय पद्धतीने पार पाडत असते, त्यामुळे तिच्या गाण्याच्या शूटिंगवेळी खूप काळजीपूर्वक सेट मांडला होता. ती डान्स करत असताना कमीत कमी 80 डान्सर तिच्या मागे डान्स करत होते. या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर हे गाणे भोजपुरी इंडस्ट्रीतले सर्वात महागडे गाणे आहे. हे गाणे बिग बजेट असल्यामुळे याची शूटिंग करण्यासही अधिक काळ लागला होता. या गाण्यातील अभिनेत्री खूपच परफेक्शन पाळत असल्याने गाण्याच्या शूटिंगमध्ये केणत्याच प्रकारची कमतराता दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षरा सिंग भोपुरी इंडस्ट्रीला देतेय पाठबळ
अक्षराने या गाणयाचा टीझर शेअर करत असताना भोजपुरी इंडस्ट्रीबद्दल कौतुक करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “माझे हेच प्रयत्न सतत सुरु असतात की, मी माझी आई भोजपुरीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल… भारतातील अनेक भाषांना भोजपुरी भाषेची ओळख करुन देईल, आपली माती बिहारसाठी  मी मरण्यालादेखिल सामोरे जाईल…” असे भले मोठे कॅप्शन लिहित या अभिनेत्रीनी तिचे बिहारप्रती असललेले प्रेम व्यक्त केले आहे.तिला तिच्या बिहार राज्यात पसरवणाऱ्या अश्लिलतेला बंद करायचे आहे. असा संदेश तिने आपल्या कॅप्शनद्वारे बिहार आणि अनेक नागरिकांना दिला आहे.

अक्षरा सिंगच्या कामाप्रती आपुलकी आणि प्रेम पाहून सगळ्यांनाच समजले असेल की, भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तिच्यासारखी एकही अभिनेत्री नाही. ‘चौसठ जोगीनिया माई’ हे गाणं अक्षराणे स्वत:च लिहिले आहे आणि स्वत:च गायले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये देखिल ती स्वत:च डान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे गितकार मनोज मतलबी(Manoj Matlabi) आणि संगितकार शिशिर पांडेय( Shishir Pandey) यांनी केले असून कोरिओग्राफी साहिल जे अंसारी याने केली आहे. हे गाणे दोन तीन दिवसांनी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टीझर पाहून चाहत्यांप्रती चागलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राडाच! शाहिद कपूरचा भावासाेबत जबरा डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील
नागराज मंजुळे पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीला देणार 100 कोटींचा सिनेमा? नुकतीच केलीय घोषणा
मौनी रॉयचा वन पीसमध्ये धुराळा! पाहणाऱ्याचीही उडेल झोप

हे देखील वाचा