Saturday, September 30, 2023

सीक्वेलची कमाल! ‘ओएमजी 2’ने 14व्या दिवशी केली बक्कळ कमाई, एकदा वाचाच

एकाच वेळी दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे मोठी तारेवरची कसत झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सनी देओल याचा सिनेमा ‘गदर 2‘ मोठा गल्ला जमावताना दिसत आहे, तर दुसरीकडे अक्षय कुमार याचाही ‘ओएमजी 2‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरून बसला आहे. या दोन सिनेमात जबरदस्त स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटाला आले होते. त्यामुळे कोणता चित्रपट जास्त पैसे कमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा चित्रपट ‘OMG 2’ बॉक्स ऑफिसवर सर्वोत्तम कामगिरी करणारा चित्रपट ठरला आहे. 12व्या दिवशी अक्षय कुमारच्या या चित्रपटाने किती गल्ला कमवाल आहे ते जाणून घेऊया.

तगड्या स्टारकास्टने सजलेला हा सिनेमा सामाजिक संदेश देण्याचे काम करताना दिसत आहे. हा सिनेमा अक्षय कुमार आणि परेश रावल अभिनित ‘ओएमजी- ओह माय गॉड’ सिनेमाचा सीक्वल आहे. तसेच, या सिनेमाला चाहते आणि समीक्षकांचा संमिश्र भरभरून प्रतिसाद देत आहेत. तसेच, या सिनेमाला सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाच्या पट्टीत राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत दिसत आहे. दरम्यान, ‘OMG 2’च्या 14व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

सलग 5 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा पहिला चित्रपट आहे , जो सुपरहिट ठरला आहे. त्याच वेळी, सुमारे 2 वर्षांनंतर, अभिनेत्याचा असा एक चित्रपट आला, ज्याने बॉक्स ऑफिसवर 100कोटींचा आकडाही पार केला आहे. चित्रपटाने गुरुवारी (24 ऑगस्ट) 2.85 कोटी कमावले आहेत. मागिल आठवड्याच्या तुलनेत ‘OMG 2’च्या कलेक्शनमध्ये बरीच घट झाली आहे. पण बजेटनुसार या सिनेमाने आधीच बंपर नफा कमावला आहे.

14व्या दिवसाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये भर टाकून, ‘OMG 2’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानुसार आता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओह माय गॉड 2’च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 126 कोटींचा आकडा पार केला आहे. तिसऱ्या वीकेंडच्या अखेरीस हा चित्रपट किमान 135-140 कोटींचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Akshas Kumar’s OMG 2 grosses on day 14)

अधिक वाचा- 
शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
‘गड आला पण…’बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, संवाद ऐकून शिवप्रेमी भारावले

हे देखील वाचा