Thursday, June 13, 2024

शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते

बॉलिवूड अभिनेते आणि ऋषी कपूर  यांचे भाऊ राजीव कपूर यांची आज म्हणजेच शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी स्मृती दिन आहे. राजीव कपूर यांनी1983 मध्ये ‘एक जान हैं हम’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यांचा अविस्मरणीय चित्रपट ठरला. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री मंदाकिनीसोबत दिसले होते. याव्यतिरिक्त ते आणखी एका कारणामुळे चर्चेत होते, ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे

राजीव यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. सर्वप्रथम ते आरके बॅनर खाली बनललेल्या ‘बीवी और बीवी’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. यानंतर स्वत: वडील राज कपूर यांनी राजीव कपूर यांना आपल्यासोबत एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ठेवले होते.

राज कपूर यांनी जेव्हा ऋषी कपूर (rushi kapoor) आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रेम रोग’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले, त्यावेळी राजीव त्यांचे सहाय्यक होते. एका सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करताना राजीव या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या (Padmini kolhapure)  प्रेमात पडले होते.

त्यांच्या प्रेमाचा हा टप्पा शूटिंगदरम्यानच सुरू झाला होता. शूटिंग दरम्यान ब्रेक मिळाल्यावर राजीव आणि पद्मिनी यांच्यात खूप गप्पा व्हायच्या. राज कपूर जेव्हा राजीव यांनी बोलवायचे, तेव्हा राजीव नेहमी पद्मिनीच्या मेकअप रूममधून बाहेर पडताना दिसायचे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये पसरल्या आणि अनेक मॅगझिनमध्ये यावर लिहिण्यात आले.

या सर्व गोष्टी राज कपूर यांना पटल्या नाहीत. त्यांनी पद्मिनीला सरळ सरळ चेतावणी दिली की, जर तिला या चित्रपटात काम करायचे असेल, तर तिला राजीवची सोबत सोडायला लागेल. जर तिने असे केले नाही, तर तिला या चित्रपटात काम करता येणार नाही. पद्मिनीने राजीव आणि चित्रपटामध्ये चित्रपटाची निवड केली. अशाप्रकारे दोघांचे नाते या चित्रपटासह संपुष्टात आले होते.

हे देखील वाचा