Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड नाद नाद नादच! रिलीजच्या 2 आठवड्यांनंतर सनी देओलच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच

नाद नाद नादच! रिलीजच्या 2 आठवड्यांनंतर सनी देओलच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच

‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ प्रत्येक सच्चा भारतीय व्यक्ती सनी देओलवर या डायलॉगमुळे जीव ओवाळून टाकताना दिसत आहेत. गदर सिनेमा म्हणजे भारतीय सिने इंडस्ट्रीचा माईकटोन ठरलेला सिनेमा आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर एका हिंदी सिनेमाची चांगलेच क्रेझ निर्मीण झाली आहे. तो सिनेमा इतर कुठला नसून सनी देओल याचा ‘गदर 2‘ आहे. मागील आठवड्यात शनिवारी (11 ऑगस्ट) सनी देओल याचा ‘गदर 2‘, तर अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2‘ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे सनीच्या सिनेमाने दरदिवशी दोन आकडी कमाई करत 300 कोटींचा अकडा पार केला आहे.

‘गदर 2‘ सिनेमा बाॅक्स ऑफिसर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अक्षयच्या सिनेमाला 100 कोटींचा आकडाही पार करता आला नाही. चला तर, सिनेमाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात…

सनी देओल (Sunny Deol) अभिनित ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकुळ घातला आहे. सिनेमाने आठव्या दिवशी 300 कोटींचा अकडा पार केला आहे. त्याचबरोबर शनिवारची आकडेवारीही आश्चर्यकारक आहे. ‘ गदर 2 ‘ रिलीज होऊन 9 दिवस उलटले आहेत, मात्र इतके दिवस उलटूनही लोकांची चित्रपटाविषयीची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. याचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे दिवसभराची कमाई आहे.

प्रेक्षकांचा उत्साह ज्या प्रकारे टिकून आहे, ते पाहता दुसरा आठवडाही पहिल्या आठवड्याप्रमाणेच दमदार कमाईने भरलेला असणार आहे. चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या 8 व्या दिवशी 20.50 कोटींची कमाई केली. त्याचबरोबर 9व्या दिवशी चित्रपटाने जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाचे कलेक्शन 335 कोटींवर पोहोचले आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 400 कोटींकडे वेगाने वाटचाल करत आहे. ‘ गदर 2 ‘ ने जगभरात 395.10 कोटींची कमाई केली आहे. (Sunny Deol’s Ghadar 2 has earned so many crores in its second week)

अधिक वाचा- 
कॉमेडियन नव्हे ‘या’ क्षेत्रात करिअर करणार होता झाकीर खान, वाचा रंजक किस्सा
72वर्षीय रजनीकांत यांनी धरले 51वर्षीय मुख्यमंत्र्यांचे पाय; पाहा व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा