Saturday, March 2, 2024

‘कॅनडियन कुमार’ म्हणून ट्रोल करणाऱ्यांना अक्षयने दिले सडेतोड उत्तर, पासपोर्ट प्रकरणावर तोडले मौन

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार अनेक वर्षापासून भारतीय चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षकांवर राज्य करत आहे. मात्र, त्याच्याकडे भारतीय असल्याचं नागरिकत्व नाही. अशा अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांनी प्रेक्षकांनी त्याला धरेवर धरले होते, पण किती दिवसतरी अभिनेता शांत बसणार. त्याने या गोष्टीवर मौन तोडले असून स्वत:च चाहत्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार (Akashay Kumar) नुकतंच पासपोर्ट न मिळाल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तो अनेक वर्षापासून भारतात राहात असला, तरी अद्याप तो भारतीय नागरीक नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. त्याचे फोटो शेअर करुन त्यावर कमेंटचा वर्षाव करत त्याला ट्रोल केलं जातंय. त्यामुळे त्याने या गोष्टीवर मौन तोडले आहे आणि स्वत:च याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार अभिनेता अक्षय कुमार याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्याने आपले मौन तोडले आहे. मुलाखतीदरम्यान सांगितल की, “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, याचा अर्थ मी कोणत्याही भारतीयापेक्षा कमी नाही. त्याशिवाय मी जास्त भारतीय आहे. मला 9 वर्षांपूर्वी पासपोर्ट मिळाला होता. माझे चित्रपट चांगले चालले म्हणून मी यात इतकं लक्ष घातलं नाही. मात्र, या गोष्टीमुळे मला वगैरे वगैरे बोललं जातं.”

 

View this post on Instagram

 

अक्षय कुमारने पुढे सांगितले की, “हे मी 2019 मध्ये बोललो होतो की, मी पासपोर्टसाठी अर्ज दिला आहे. पण महामारी आली आणि सगळं काही साधारण दीड एक वर्षांपर्यंत बंद झालं. मला रिनाऊंस लेटरही मिळालं. लवकरच माझा पासपोर्टही मिळेल.” अभिनेत्याने त्याच्या नगरिकत्वाबद्दल प्रश्न करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तर दिले.

अक्षयला अनेकदा कॅनडियन कुमार म्हणूनही ट्रोल केले होते त्यांना देखिल अभिनेत्याने सडेतोड उत्तर देत सांगितले की, “मला वाटतं की लोक याच गोष्टीवर ठाम आहेत की, मी सगळ्यांना माझा पासपोर्ट दाखवावा आणि सांगावं की, मी भारतीय आहे. मला नाही वाटत लोकांना असं काही बोलण्याची संधी मिळाली, म्हणून मी यासाठी अर्ज केला आहे.”

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियावर सतत ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना अभिनेत्याने चांगलीच फटकार लावली आहे, त्याच्या मते पासपोर्ट आलां की, त्याचा फोटो आणि व्हिडिओ देखिल बनवून टाकण्याइतपत तो स्पष्टीकरण देऊ शकतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
संजना सांघीची हटके स्टाईल, नव्या फोटोत दिसतेय खास!
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘अवतार 2’ सोबत पाहायला मिळू शकते ‘पुष्पा 2’ ची झलक?

हे देखील वाचा