Monday, February 26, 2024

‘अडीच वर्षांपूर्वी केला अर्ज’, अक्षय कुमारला भारतीय पासपोर्ट मिळण्यास का हाेताेय उशीर?

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याने अलीकडेच खुलासा केला की, त्याने भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. कॅनडाचा पासपोर्ट धारण केल्यामुळे अक्षयला वारंवार टीकेला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर त्याला ‘कॅनडा कुमार’ म्हटले जात आहे. त्यांच्या नागरिकत्वावरून त्यांना वेळोवेळी ट्रोल करण्यात आले आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमाशी बाेलताना अक्षय कुमार (Akshay Kumar) याने सांगितले की, “कॅनेडियन पासपोर्ट असण्याचा अर्थ असा नाही की, मी भारतीय नाहीये. मी भारतीय आहे. मी येथे अनेक वर्षांपासून आहे. जे घडले त्या कारणामध्ये मला जायचे नाही. हाेय, माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. मी 2019 मध्ये म्हटले होते की, मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आणि नंतर कोविड-19 साथीचा रोग आला आणि अडीच वर्षासाठी गाेष्टी थांबल्या.” लवकरच अभिनेत्याला भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अक्षय कुमारने या वर्षाच्या सुरुवातीला माध्यमाशी बोलताना सांगितले हाेते की, “कॅनडाचे नागरिकत्व असूनही तो भारतात कर भरतो.” तो म्हणाला की, “तो या देशाचा आहे आणि नेहमीच भारतीय असेल.” अक्षयने असेही सांगितले की, “त्याच्या चित्रपटांना यश मिळत नसल्याने त्याने दुसरीकडे जाण्याचा विचार केला हाेता.”

अक्षय कुमार म्हणाला, “काही वर्षांपूर्वी माझे चित्रपट चालत नव्हते. जवळपास 14-15 चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे मला वाटले की, कदाचित दुसरीकडे कुठेतरी जाऊन काम करावे. बरेच लोक कामानिमित्त कॅनडाला जातात, पण तरीही ते भारतीय आहेत. पण इथे नशीबाने मला साथ दिली नाही तर त्यावर काहीतरी करायला हवे, असा विचारह मी केला. मी तिथं गेलो, तिथल्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळालं.”

अक्षय कुमारच्या कारकीर्द विषयी बाेलायचं झालं तर, त्याने ‘हेरा फेरी’, ‘रामसेतू’, ‘रक्षा बंधन’, ‘हाऊसफूल’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.(bollywood actor akshay kumar apply for indian citizenship reveals about passport delay)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया अन् रणबीरच्या राजकुमारीला भेटणे सोप्पं नाही, जोडप्याने भेटीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवली ‘ही’ अट

‘भारत जोडो यात्रे’मध्ये रितेश देशमुख झाला भवूक, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना

हे देखील वाचा