Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! अक्षय कुमार पुन्हा एकदा कोरोना पॉसिटीव्ह

सध्या कोरोना कमी झाला असला तरी तो पूर्णपणे आपल्या आयुष्यात गेला नाही. अजूनही कोरोनच्या बऱ्याच केसेस असून, काळजी घेणे महत्वाचे आहे. यातच आता बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा कोरोना पॉसिटीव्ह झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सर्वाना ही माहिती दिली आहे. पॉसिटीव्ह झाल्यामुळे यावर्षी संपन्न होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अक्षय सहभागी होणार नाही.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “मी कान्स २०२२ मध्ये भारताच्या पवेलियनमध्ये जाणून आमच्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. मात्र माझी कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. आता मी आराम करणार आहे. मी अनुराग ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. तिथे जाणे मला योग्य वाटत नाही.” अक्षय कुमारने हे ट्विट करताच सोशल मीडियावर त्याला लवकर बरे होण्यासाठी फॅन्स, कलाकार शुभेच्छा देताना दिसत आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील आजच्या घडीचा सर्वात मोठा आणि महागडा अभिनेता आहे. त्याचे सिनेमे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करतात. लवकरच त्याचा ‘पृथ्वीराज’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला गेला. हा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून, सोशल मीडियावर त्याचे खूपच कौतुक केले जात आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत मानुषी छिल्लर असून, तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा अतिशय भव्य आणि आलिशान दिसत आहे.

तत्पूर्वी याआधी देखील अक्षयला कोरोना झाला होता. मात्र सुदैवाने तो यातून लवकर बरा झाला. तसे पाहिले तर अक्षय त्याची आणि त्याच्या आरोग्याची खूपच काळजी घेतो. तो फिटनेस फिक्र असून, कमालीचा फिटनेस ही त्याची दुसरी ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयचा बच्चन पांडे सिनेमा प्रदर्शित झाला होता, मात्र या सिनेमाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा