Thursday, March 28, 2024

‘हा’ गायक असता तर नेहा कक्करला मिळाली असती तगडी टक्कर, मात्र कमी वयातच घेतला जगाचा निरोप

नेहा कक्कर (Neha Kakkar) आजच्या काळातील सर्वात हिट गायिका आहे. आजकालच्या प्रत्येक चित्रपटात तिची गाणी नक्कीच असतात. ती तिचे म्युझिक व्हिडिओ लाँच करत राहते, जे येताच सोशल मीडियावर धमाल करतात. पण एक गायक असाही होता, जो आज जिवंत असता तर नेहा कक्करला तगडी टक्कर देऊ शकला असता. त्याच्या गायकीत इतकी ताकद होती की, त्याने नेहासोबत दमदार स्पर्धा केली असती.

नेहाच्या आवाजाला संदीपने दिली टक्कर
नेहा कक्करने लहानपणापासूनच गाणे गायला सुरुवात केली आणि तिने ‘इंडियन आयडल’मध्येही (Indian Idol 2) तिची प्रतिभा दाखवली होती. पण या शोमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने गायकीमध्ये नेहाला खूप मागे टाकले होते. आम्ही ‘इंडियन आयडल’च्या दुसऱ्या सीझनबद्दल बोलत आहोत. आज यशाची शिखरे गाठणारी नेहा त्यावेळी इंडियन आयडलच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडली होती. तिच्या आवाजाला टक्कर देणारा आवाज होता, तो संदीप आचार्यचा (Sandeep Acharya). तोच संदीप आचार्य, ज्याने ‘इंडियन आयडल’चा दुसरा सीझन जिंकून सर्वत्र वाहवा मिळवली होती. (neha kakkar had threat with sandeep acharya but he died at young age)

जिंकला ‘इंडियन आयडल’
संदीप आचार्य जेव्हा जेव्हा माईक धरायचा, तेव्हा तो रसिकांना त्याच्या आवाजात बांधून ठेवायचा. चेहऱ्यावर मंद हास्य असलेल्या या गायकाने संपूर्ण देशाची मने जिंकली होती. बिकानेर, राजस्थान येथे राहणाऱ्या संदीप आचार्यचा जन्म ४ फेब्रुवारी, १९८४ रोजी झाला. ‘इंडियन आयडल’चा दुसरा सीझन जिंकून, तो रातोरात स्टार बनला. हा शो जिंकल्यावर त्याला सोनी बीएमजी या कारसोबत एका म्युझिक अल्बमसाठी एक कोटींचा करार मिळाला होता.

वयाच्या २९व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
ही शो जिंकल्यानंतर संदीपची कारकीर्द खूप पुढे गेली असती, पण लहान वयातच तो हे जग सोडून जाणार हे कोणास ठाऊक! १५ डिसेंबर २०१३ रोजी, २९ वर्षीय संदीपने या जगाचा निरोप घेतला. माध्यमातील वृत्तानुसार, संदीपला कावीळचा त्रास होता. त्याला गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती इतकी बिघडली होती की, त्याला वाचवता आले नाही. खरं तर, ज्यावेळी संदीपची प्रकृती खालावली होती, त्या वेळी तो बिकानेरमध्ये एका लग्नाला गेला होता. यादरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. मात्र तो हे जग सोडून निघून गेला.

हेही वाचा :

हे देखील वाचा