Tuesday, June 25, 2024

खिलाडी कुमारनंतर अक्षय बनला ‘सेल्फी किंग’, नावावर केले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय हा प्रत्येक गोष्टींमध्ये पुढेच आहे. चित्रपट करण्यात, टॅक्स भरण्यात, फिटनेसच्या बाबतीत आदी अनेक बाबींमध्ये अक्षय हा आघाडीवर आहे. आता अक्षयने नुकताच एक एक रेकॉर्ड केले आहे. एका वर्षांत जास्त सिनेमांचा नाही हो. तर हा रेकॉर्ड आहे जागतिक रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अक्षयने स्वतःचे नाव नोंदवले आहे. आता तुम्ही म्हणाल अक्षयने असा कोणता विक्रम केला की त्याचे नाव या रेकॉर्डमध्ये आले आहे.

अक्षय कुमार सध्या त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो अनेक विविध शक्कल लढवत आहे. अक्षयने बरीच काळापासून एकही हिट सिनेमा दिला नसल्याने हा सिनेमा हिट करण्यासाठी तो हर प्रयत्न करताना दिसत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षयने हे हटके रेकॉर्ड केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय नेहमीच आपल्या स्टंट्सने सर्वांचे मनं जिंकतो. मात्र यावेळी त्याने केलेले रेकॉर्ड सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. अक्षयने सिनेमाच्या प्रमोशनवेळी केवळ 3 मिनिटात 184 सेल्फ पोर्ट्रेट पिक्चर्स अर्थात सेल्फी घेत हा रेकॉर्ड बनवला आहे. 2015 साली डिवाइन जॉनसनने 105 सेल्फी घेऊन हा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर जेम्स स्मिथने 3 मिनट में 168 सेल्फ पोर्ट्रेट पिक्चर्स घेत जॉनसनचा रेकॉर्ड मोडला. आज अक्षयने या दोघांचाही रेकॉर्ड मोडत 184 सेल्फी घेतल्या आहेत.

अक्षय कुमारने ही आनंदाची बाब त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्वांसोबत शेअर केली आहे. या रेकॉर्ड बनवण्याचा एक व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या फॅन्ससोबत सेल्फी घेताना दिसत आहे. त्याने त्याच्या फॅन्सच्या सेल्फीसोबत स्वतःचा देखील फोटो शेअर केला आहे. अक्षयने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मी आयुष्यात जे काही मिळवले आणि आज जिथे आहे, ते केवळ माझ्या फॅन्सच्या निस्वार्थ प्रेमामुळे. हे त्यांना माझे खास ट्रीब्यूट आहे. हे स्वीकार करत की ते माझ्या करियरमध्ये माझ्यासोबत कसे उभे राहिले.”

पुढे अक्षयने लिहिले, “माझ्या फॅन्सच्या मदतीने आम्ही ३ मिनिटात सर्वात जास्त सेल्फी घेण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तुम्हा सर्वाना धन्यवाद. हे खूपच खास होते आणि मी ते कायम स्मरणात ठेवेल.” लवकरच अक्षय आणि इमरान हाश्मी यांचा २४ फेब्रुवारी रोजी सेल्फी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा मल्याळम सिनेमा ‘ड्राइविंग लाइसेंस’ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा