भारीच ना!! अक्षय कुमारच्या ‘फिलहाल २ मोहब्बत’ गाण्याने तोडले सर्व रेकॉर्ड्स; यूट्यूबवर होतंय नंबर १ ट्रेंड


या गाण्याचे प्रेक्षकांकडूनही दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर केवळ १ तासातच गाण्याला ४ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता या गाण्याने यूट्यूबच्या जगात अजून एक रेकॉर्ड तयार केला आहे. हे गाणे यूटुबवर ३ दिवसांत १०० मिलियनपेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे. हे एक रेकॉर्ड आहे. हे गाणे यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ तासात सर्वात जास्त पाहिलेले पहिले भारतीय गाणे बनले आहे. २०१९ साली आलेल्या’ ‘फिलहाल’ या गाण्याला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मागच्या अनेक काळापासून नुपूर आणि अक्षयच्या या गाण्यांची भरपूर चर्चा होती. या गाण्याने त्याच्या आधीच्या गाण्याचे देखील सर्व रेकॉर्ड तोडले आहे. सध्या यूट्यूबवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे.

या गाण्यात नुपूर अक्षय कुमारची गर्लफ्रेंड असते. मात्र तिचे लग्न दुसऱ्यासोबत होते. असे असुनही अक्षय तिला क्षणभर देखील विसरू शकत नाही. तो तिच्या घराखाली उभा असताना दिसतो, तिच्या लग्नात तोंडावर हसू आणि डोळ्यात अश्रू घेऊन नाचताना देखील दिसतो. या गाण्याचा शेवट खूपच हृदयद्रावक दाखवण्यात आला आहे.

‘फिलहाल २’ हे गाणे गायक बी प्राकने गायले असून, या गाण्याला संगीत देखील त्यानेच दिले आहे. तर या गाण्याचे बोल जानीने लिहिले आहेत. बी प्राकने यापूर्वी ‘किस्मत’, ‘मन भरिया’, ‘पछताओगे’ सारखे अनेक हिट गाणे लिहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.