‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर


‘बिग बॉस १३’ मध्ये चर्चेत असणारे स्पर्धक म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल. त्या दोघांची वादावादी झाल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. अनेक वेळा मीडियासोबत बोलताना सिद्धार्थने सांगितले आहे की, तो सिंगल आहे. तर शहनाझने त्याच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने हे देखील सांगितले आहे की, तिचे हे एकतर्फी प्रेम आहे. अशातच अशी बातमी आली आहे की, त्या दोघांमध्ये काही ठीक चालले नाहीये. या बातम्या येताच सिद्धार्थने त्याचे मौन तोडले आहे. ( Siddharth Shukla talked about news viral about his and shehnaaz gill)

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिलच्या बातम्या आल्यानंतर सिद्धार्थने एक ट्वीट केले आहे, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याने लिहिले आहे की, “मी काही बातम्या वाचत आहे, त्या खूपच मजेशीर आहे. जर तुम्हाला आयबॉल्स पाहिजे तर काहीतरी सकारात्मक लिहा ना. एवढी नकारात्मकता तुम्ही आणता कुठून? तुम्ही सगळे मला माझ्यापेक्षाही कसे काय चांगले ओळखू शकता. यापेक्षा जास्त मी काय बोलू आता. देव तुमचं भलं करो.”

सिद्धार्थने त्याच्या या ट्विटमध्ये शहनाझसोबत झालेल्या झालेल्या भांडणाचा उल्लेख केला नाही. हे ट्वीट बघून चाहते आता असा अंदाज लावत आहेत की, तो कदाचित सनासोबत झालेल्या ब्रेकअपबाबत बोलत आहे.

‘बिग बॉस १३’ मधील स्टार जोडी सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल हे शो संपल्यानंतर देखील एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्या दोघांना एकत्र बघायला चाहत्यांना खूप आवडते. बिग बॉसमध्ये भलेही शहनाझ सिद्धार्थवर नाराज होती, पण जेव्हा जेव्हा त्याला गरज लागली तेव्हा तेव्हा ती त्याच्या मदतीला धावून आली आहे. मग ते रश्मी देसाई आणि असीम रियाजसोबत भांडण का असेना. शहनाझने नेहमीच त्याचा राग शांत करण्याचा आणि त्याला कूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

बिग बॉसनंतर दोघेही एका म्युझिक व्हिडिओमध्ये सोबत दिसले होते. प्रेक्षकांनी त्यांना खूप प्रेम दिले होते. कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ नुकतेच सुपरहिट वेब शो ‘ब्रोकन बट ब्युटीफूल ३’ मध्ये दिसला होता. शहनाझ एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. लवकरच ती दिलजीत दोसांझसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.