Sunday, April 14, 2024

‘गदर 2’ आणि ‘जेलर’शी टक्कर होऊनही ‘OMG 2’ने रविवारी छापले ‘एवढे’ कोटी, 15 टक्क्यांनी वाढली कमाई

काही सिनेमे असे असतात, जे कुठल्याही वादाशिवाय बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करून विक्रम नोंदवतात. मात्र, काही सिनेमे असेही असतात, ज्यांच्या विषयामुळे काहींच्या भावनांना ठेच पोहोचते. मात्र, तरीही ते बॉक्स ऑफिसवर यश मिळवतात. असेच काहीसे आता अक्षय कुमार याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘ओएमजी 2‘ सिनेमाबाबत घडत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही अक्षयचा हा सिनेमा 2023मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक होता. हा सिनेमा सनी देओल याच्या ‘गदर 2‘ सिनेमासोबत शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला. सिनेमाची सुरुवात खूप जास्त झाली नाही, पण वीकेंडला या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. चला तर, अक्षयच्या ‘ओएमजी 2’ सिनेमाची तिसऱ्या दिवसाची कमाई किती आहे, पाहूयात…

‘ओएमजी 2’ने रविवारी किती कोटी छापले?
‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमा सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. या सिनेमात पंकज त्रिपाठी, यामी गौतम मुख्य कलाकारांच्या भूमिकेत आहेत. तसेच, अक्षय कुमार (Akshay Kumar) याने सिनेमात भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारली आहे. अक्षयचा हा सिनेमा दोन मोठ्या ‘गदर 2’ (Gadar 2) आणि ‘जेलर’ (Jailer) सिनेमांनी टक्कर देऊनही बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. सिनेमाला रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत आणि सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

‘ओएमजी 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी 10.26 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ होऊन 15.30 कोटी रुपये झाली. त्यानंतर आता बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 14 ऑगस्ट) सिनेमाने 15 टक्क्यांची उसळी घेत 16.50 ते 18 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच या सिनेमाने तीन दिवसात एकूण 43 कोटी रुपये कमावले आहेत.

येत्या 15 ऑगस्ट रोजी कमाईत वाढ होण्याची आशा
‘ओएमजी 2’ने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड मिळवली आहे. सिनेमा 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनीच्या सुट्टीनिमित्त आणखी जास्त कमाई करून 100 कोटी रुपयांचा आकडाही पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा सिनेमा हिट सिनेमा बनण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. विशेष म्हणजे, सलग 5 फ्लॉप सिनेमांनंतर अक्षय कुमारच्या या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रंजक बाब अशी की, या सिनेमाला मिळालेल्या अ प्रमाणपत्र आणि ‘गदर 2’शी टक्कर होऊनही सिनेमा चांगली कमाई करत आहे. (akshay kumar film omg 2 box office collection day 3 sunday growth 15 percent know the numbers)

महत्त्वाच्या बातम्या-
नाद केला पण पुरा केला! ‘तारा-सकीना’च्या ‘Gadar 2’ने तिसऱ्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, ‘पठाण’चाही विक्रम तुटला
खळबळजनक! अक्षय कुमारला चापट मारा आणि 10 लाख मिळवा, कुणी आणि का केली अशी घोषणा?

हे देखील वाचा