Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड ‘दिग्दर्शन D ग्रेड, सिनेमा C ग्रेड; गटर 2…’, प्रसिद्ध अभिनेत्याने सनी देओलच्या सिनेमाला केले ट्रोल

‘दिग्दर्शन D ग्रेड, सिनेमा C ग्रेड; गटर 2…’, प्रसिद्ध अभिनेत्याने सनी देओलच्या सिनेमाला केले ट्रोल

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि सनी देओल यांचे बहुप्रतिक्षित सिनेमे शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. अक्षयचा ‘ओएमजी 2‘, तर सनीचा ‘गदर 2‘ हे दोन्ही सीक्वल सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अभिनेता कमाल आर खान याने आधी अक्षयच्या सिनेमाचे कौतुक केले होते. मात्र, आता त्याने सनीच्या सिनेमाविषयी गरळ ओकली आहे. त्याने त्याच्या ‘गदर 2’ सिनेमाला सी ग्रेट सिनेमादेखील म्हटले आहे. तसेच, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनाही ट्रोल केले आहे. त्यामुळे आता त्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला केआरके?
अभिनेता केआरके (KRK) याने ट्वीट करत सनी देओल याच्या ‘गदर 2’ सिनेमाला ट्रोल केले आहे. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आताच या वर्षातील सर्वात मोठा कॉमेडी सिनेमा गदर 2 पाहिला. या सिनेमातील प्रत्येक सीन खूपच मजेशीर आहे. लोक हसून हसून मरतील. फक्त अनिल शर्माच असा कॉमेडी सिनेमा बनवू शकतात, जिथे एक हिरो विजेचा खांब भांडणादरम्यान उघडतो. अनिल शर्मांचे दिग्दर्शन डी ग्रेडचे आहे आणि सिनेमा सी ग्रेड आहे. माझ्याकडून या सिनेमाला शून्य रेटिंग. या सिनेमाचे नाव गदर 2 नाही, गटर 2 असायला पाहिजे.”

‘ओएमजी 2’ची प्रशंसा
एकीकडे केआरकेने ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाला शून्य रेटिंग दिली आहे, तर दुसरीकडे त्याने ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाची प्रशंसा केली होती. त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, “काही वेळापूर्वी अक्षय कुमारचा ओएमजी 2 सिनेमा पाहिला आणि हा खूपच शानदार आहे. अक्षयचा अभिनय आणि लूक टॉप क्लास आहे. बाकी सर्व कलाकारांनी आपले काम चांगल्याप्रकारे केले. सर्व पालकांनी आपल्या मुलांसोबत हा सिनेमा पाहिला पाहिजे. मी या खूपच चांगल्या सिनेमाला 3 रेटिंग देईल.”

कमाईत ‘गदर 2’ आघाडीवर
केआरकेने ‘गदर 2’ सिनेमाला ट्रोल केले असले, तरीही पहिल्या दिवशीच सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 40 कोटी रुपये कमाई केली आहे. तसेच, अक्षय कुमार याच्या ‘ओएमजी 2’ सिनेमाने जवळपास 9 ते 10 कोटींची कमाई केली आहे. अशात वीकेंडला या सिनेमांच्या कमाईत आणखी भर पडू शकते. त्यामुळे कोण जास्त कमाई करतं, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (actor krk troll sunny deol film gadar 2 directed by anil sharma)

महत्त्वाच्या बातम्या-
मराठमोळी गायिका आनंदी जोशी अडकली लग्नाच्या बेडीत, गायकासोबतच थाटला संसार; पाहा फोटो
तब्बल 20 वर्षांपासून आपल्या वडिलांना भेटली नाही ‘वेड’ फेम जिया शंकर; जगापुढे मांडल्या वेदना; म्हणाली…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा