मागील आठवड्यात 11 ऑगस्ट रोजी अक्षय कुमार याचा बहुप्रतिक्षित ‘ओएमजी 2‘ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमासोबतच सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमाही रिलीज झाला होता. गदरने जबरदस्त कमाई करूनही अक्षयच्या सिनेमाला ठीक-ठाक ओपनिंग मिळाली. समीक्षकांनीही या सिनेमाचे गुणगान गायले. असे म्हटले जात आहे की, पुढील काही दिवसांमध्ये सिनेमाच्या कमाईत वाढ होऊ शकते. अशातच सिनेमाबाबत जोरदार विरोध दर्शवला जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.
अमित राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा शाळेतील लैंगिक शिक्षणाच्या विषयावर आधारित आहे. अशात हा सिनेमा समाजातील एका वर्गाच्या भावना दुखापत असल्याचे दिसत आहे. अशात राष्ट्रीय हिंदू परिषदेने सिनेमात भगवान शंकराचा दूत ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमार (10 Lakh Rupees To Slap Akshay Kumar) याला चापट मारणे किंवा थुंकणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
नामांकित वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगण्यात आले की, बक्षिसाची घोषणा हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी केली होती. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) आग्र्यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा पुतळा आणि सिनेमाचा पोस्टरही जाळला. खरं तर, अक्षयने सिनेमात भोलेनाथाच्या दूताची भूमिका साकारली आहे. पाराशर यांच्यानुसार, सिनेमा ‘परमेश्वराची प्रतिमा मलीन करतो.’
परिषदेने ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा तेव्हापासून वादात आहे, जेव्हापासून निर्मात्यांनी या सिनेमाचे पोस्टर जारी केले आहेत. सीबीएफसीमध्ये सिनेमाच्या तक्रारीनंतर या सिनेमावर कात्री चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
Rashtriya Hindu Parishad has announced a prize of ₹10 lakh for anyone who slaps Akshay Kumar.
Fools! They don't know that when it's about money, Akki will slap himself and take the prize.
— PuNsTeR™ (@Pun_Starr) August 12, 2023
यासोबतच सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला ‘अ’ सर्टिफिकेट दिले आहे. अनेक संशोधन आणि सेन्सॉर बोर्डाकडून मिळालेल्या परवानगीनंतर आता हा सिनेमा चित्रपटगृहात पोहोचला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची टक्कर ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाशी आहे. सनी देओल याच्या सिनेमाने पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या सिनेमाने 40 कोटी रुपये, तर अक्षयच्या सिनेमाने जवळपास 10 कोटी रुपये कमावले होते. (omg 2 rashtriya hindu parishad bharat announces 10 lakh rupees reward to slap superstar akshay kumar know here)
महत्त्वाच्या बातम्या-
सलमान नसता तर ‘हा’ अभिनेताही नसता, सल्लूमुळेच त्याने Bollywoodमध्ये रोवले घट्ट पाय
‘देवों कें देव महादेव’ बनून घराघरात पोहोचला मोहित रैना, ‘हे’ रंजक किस्से तुम्हाला माहितीच पाहिजेत