Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘श्रेयसच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमार सतत कॉल करत होता’, दीप्ती तळपदेने केला खुलासा

‘श्रेयसच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमार सतत कॉल करत होता’, दीप्ती तळपदेने केला खुलासा

अभिनेता श्रेयश तळपदे (Shreyash Talpade) हा मराठी तसेच बॉलिवूडमधील एक हुशार आणि अनुभवी कलाकार आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर एक मोठा प्रसंग ओढवला होता. तो म्हणजे श्रेयसला अचानक हृदयविकाराचा झटका आला. आणि तातडीने त्याच्यावर सर्जरी देखील करावी लागली. यानंतर त्याच्या चाहत्यांना खूप टेन्शन आले होते. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छानी श्रेयश आता पूर्णपानदे बरा आहे आणि तो त्याच्या कामावर देखील परतला आहे. नुकतेच त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने त्यावेळी नक्की काय झाले होते याचा खुलास केला आहे.

दिप्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याची बातमी मिळताच अक्षयने श्रेयसला चांगल्या सुविधा आणि उपचारासाठी चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरला होता. दीप्तीने सांगितले की, चित्रपट दिग्दर्शक अहमद खान आणि त्यांची पत्नी देखील श्रेयसच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले.

दीप्तीने पुढे सांगितले की, “अक्षय कुमार तिला फोन करत होता आणि विचारत होता, दीप्ती, आपण त्याला शिफ्ट करू का? तुम्ही परवानगी दिली तर आम्ही त्याला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करू.” तिने पुढे सांगितले की, सकाळी अक्षयने तिला पुन्हा कॉल केला आणि विचारले की, मला केवळ २ मिनिटे त्यांना भेटायचे आहे.” या संवादादरम्यान, त्यांनी या कठीण काळात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांकडून मिळालेल्या प्रचंड सहकार्याबद्दल सर्वांचे आभारही व्यक्त केले.

श्रेयस तळपदेनेही आपल्या सहकाऱ्यांकडून मिळालेला पाठिंबा खूप मोलाचा असल्याचे त्याने सांगितले आणि सगळ्यांचे आभार देखील मानले. हृदयविकाराचा झटका त्याच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असल्याचे त्याने एका संवादात सांगितले होते. मुंबईतील ‘वेलकम टू जंगल’च्या शूटिंगवरून परतल्यानंतर श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला.

या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत काम करत आहे. याशिवाय कंगना रणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, हॉस्पिटलमधून डिस्चार्जसोबत अभिनेत्याची तब्येत एकदम ठणठणीत
रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक, ‘या’ ठिकाणी घेणार बांधणार लग्नगाठ

हे देखील वाचा