Saturday, September 30, 2023

अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट; ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर प्रदर्शित…

अक्षय कुमारचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटाला आला आहे. या चित्रपटने चांगलाच धूमाकूळ घातला. अक्षय कुमारच्या चाहत्यांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. आता अक्षय कुमारच्या चाहत्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी (9सप्टेंबर) अक्षय कुमार त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. याच दिवशी त्याने त्याच्या चाहत्यांनी एक गिफ्ट दिल आहे.

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar ) ‘वेलकम 3’ या (Welcome 3 ) विनोदी चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आज अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना भेट देताना या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच त्याने चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘वेलकम 3’ चा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

‘वेलकम टू द जंगल’च्या टीझरबद्दल सांगायचे तर, तो खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. टीझरची सुरुवात जंगलापासून होते. जिथे चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट आर्मी ड्रेस परिधान करून ‘वेलकम 3’चे शीर्षक गीत गाताना दिसत आहे. दिशा पटानी आणि अक्षय कुमार यांच्यातही भांडण झाले आणि त्यानंतर रवीना टंडनने हस्तक्षेप केला आहे.

 सोशल मीडियावर टीझर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले आहे, “आज मला आणि तुम्हा सर्वांना वाढदिवसाची भेट दिली आहे. जर तुम्हाला ते आवडले तर वेलकम.” यासोबतच अक्षयने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार, ‘वेलकम टू द जंगल’ पुढच्या वर्षी 20 डिसेंबर 20 24रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये पहिल्यांदाच 24 कलाकार कॅपेला परफॉर्म करताना दिसणार आहेत.विशेष म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार बऱ्याच काळानंतर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. (Akshay Kumar Welcome 3 teaser released.)

अधिक वाचा-
‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर मलायका अरोराने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,’शाहरुख तुझ्यासारखा…’
‘भारत, इंडिया, हिंदुस्थान अन्…’रितेश देशमुखने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले, ‘जर तुम्ही…’

हे देखील वाचा