Thursday, July 18, 2024

‘भारत, इंडिया, हिंदुस्थान अन्…’रितेश देशमुखने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले, ‘जर तुम्ही…’

मराठी सिनेसृष्टील प्रसिद्ध अभिनते आणि दिगर्शक रितेश देशमुख सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रितेश सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रितेशच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट वेड चांगलाच गाजला आहे. वेड चित्रपटात रितेश आणि त्याची पत्नी जेनिलियाने काम केले आहे. या चित्रपटाने बाॅक्य ऑफिसवर चांगली कमाई करत अनेक विक्रम मोडून काढले आहेत. सध्या रितेश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांंपासून सोशल मीडियावर इंडिया आणि भारत या नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे. देशात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावावरून मोठा वाद सुरू आहे.भारताचं इंग्रजी नाव ‘इंडिया’ आहे ते बदलून सगळीकडे ते ‘भारत’ केलं जाणार असल्याचे बोलले जात आहे. या वादावर अनेक राजकारणी व सेलिब्रिटी आपली प्रतिक्रिय दिल्या आहे. यादरम्यान आता रितेशने (Riteish Deshmukh) देखील एक ट्विट केले आहे.

रितेशने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. ज्यात भारत, इंडिया, हिंदुस्थान व सगळी नावं सारखीच असे चार ऑप्शन रितेशने त्यात लिहिली आहेत. तसेच त्याने ‘तुम्हाला काय वाटतं?’ असं कॅप्शन रितेशने दिलं आहे. त्याने केलेल्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. रितेशचे हे ट्विट सोशल मीडियार चर्चेचा विषय ठरत आहे.

 या ट्विटवर कमेंट करत एकाने लिहिले की, “जर तुम्ही चंद्राला चांद म्हणाल तर समुद्राच्या भरती मात्र तशाच राहतील.” दुसऱ्याने लिहिले की, “देशाच नाव काय आहे याने फरक नाही पडत. देशाच नाव कुठे कुठे आहे याने फरक पडतो.” तर आणखी एकाने लिहिले की,”भारत, इंडिया, हिंदुस्थान ही सगळी नावं सारखीच आहेत.” (Riteish Deshmukh post on the name of the country has become a hot topic on social media)

अधिक वाचा-
बोल्ड एँड ब्युटीफुल! करिश्मा तन्नाने शेअर केला हॉट फोटो, चाहत्यांसोबतच कलाकारांनाही पाडला कमेंट्सचा पाऊस
‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर मलायका अरोराने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,’शाहरुख तुझ्यासारखा…’

हे देखील वाचा