Monday, July 1, 2024

‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बेलबॉटम’ उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी रिलीझ होणार आहे. गेल्या वर्षी कोरोना कालावधीपासून हा चित्रपट चर्चेत आला होता. जो लॉकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट रिलीझ होण्यापूर्वी चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा आहे. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग तीन दिवसांपासून सुरू झाले असून लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे.

‘बेल बॉटम’ रिलीझ होण्यापूर्वी, अक्षय कुमार देखील या दिवसात त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला पोहोचला आहे. क्वारंटाईन संपल्यानंतर अक्षय कुमारने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत तो एका बागेत सायकल चालवताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याच्या जॅकेटवर पोलीस लिहिले आहे. हे शेअर करत त्याने सांगितले की, तो ताजी हवा घेत आहे आणि रतलामच्या रस्त्यांची आठवण येत आहे. (Akshay Kumar’s ‘Bell Bottom’ to be released on silver screen tomorrow)

घेतली मोठी जोखीम
‘बेलबॉटम’ बद्दल लोकांची क्रेझ प्रचंड प्रमाणात आहे. जरी देशभरात सिनेमा हॉल अद्याप उघडलेले नाहीत. तरी पण दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटाचे अगोदरच बुकिंग पूर्ण झाले आहे. सध्या, बहुतेक शहरांमधील सिनेमागृहांना केवळ ५०% क्षमतेसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत चित्रपट रिलीझ करताना तोटा होण्याचाही धोका असतो.

अक्षय कुमार स्मार्ट पाऊल
अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीझ डेटबाबत स्मार्ट पाऊल उचलले आहे. अक्षयचा हा चित्रपट देशभक्तीपर आहे. परंतु निर्मात्यांना हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीझ करता आला असता, परंतु त्यांनी ‘शेरशाह’ आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटांशी स्पर्धा केली नाही. या दोन चित्रपटांमध्ये ‘शेरशाह’ ने अव्वल स्थान मिळवले आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहता एकतर मेकर्स चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलत आहेत किंवा ओटीटीवर रिलीझ करत आहेत. अशा स्थितीत चित्रपट रिलीझ करताना तोटा होण्याचाही धोका असतो. या कालावधीत ‘बेलबॉटम’ हा थेट चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. या संदर्भात अक्षय कुमार म्हणाला होता की, “प्रत्येकावर खूप दबाव आहे, पण मला विश्वास आहे की सर्व काही ठीक होईल. यामध्ये एक आव्हान आणि एक धोका आहे. परंतु जर तुम्ही जीवनात जोखीम घेतली नाही, तर तुम्ही काय केले? यामुळेच हा चित्रपट रिलीझ करायचा निर्णय घेतला आहे.”

अक्षय कुमारने १५ ऑगस्टच्या वीकेंडला चित्रपट रिलीज न करून रक्षाबंधनाच्या वीकेंडला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ऍडव्हान्स बुकिंग रिपोर्ट पाहता, ‘बेलबॉटम’ ६-७ कोटींचे ओपनिंग कलेक्शन देऊ शकतो. चित्रपट किती स्क्रीनवर रिलीझ होत आहे, हे अजून ही गुलदस्त्यात आहे. परंतु आगाऊ बुकिंग अहवाल पाहून निर्मात्यांना आनंद झाला आहे. अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटामध्ये वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा ट्रेलर आधीच प्रेक्षकांनी पसंत केला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा