Sunday, October 19, 2025
Home मराठी पाठक बाईंच्या सुंदरतेवर भाळले चाहते; लक्षवेधी कॅप्शनसह मनमोहक फोटो आले समोर

पाठक बाईंच्या सुंदरतेवर भाळले चाहते; लक्षवेधी कॅप्शनसह मनमोहक फोटो आले समोर

‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर (पाठक बाई) आणि हार्दिक जोशी (राणा दा) यांना प्रचंड ओळख मिळाली. अक्षया यात बरीच साधी आणि सोज्वळ दाखवण्यात आली होती. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. याची झलक तुम्हाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळेलच. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय पाहून तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असेच तिचे भुरळ पाडणारे फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अक्षयाचा मनमोहक अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये अक्षयाने रंगीबेरंगी साडी, तर हिरव्या रंगाचं ब्लाउज परिधान केलं आहे. विशेष म्हणजे, यात तिने कोणतेही अतिरिक्त दागिने परिधान केले नाहीत, मात्र तरीही तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे.

हे फोटो अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यातील तिचा भुरळ पाडणारा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. यातील अभिनेत्री सुंदरता अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. अगदी कमी कालावधीत या फोटोवर ४८ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत. फोटो शेअर करत अक्षया कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “देखा हज़ारों दफ़ा आपको फिर बेक़रारी कैसी है…” (Akshaya deodhar shared her glamorous look in saree)

अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच लाखो रसिकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा