बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे या वर्षी लग्न करणार, अशा बातम्या येत होत्या. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींचे लग्न झाले आणि काहीजण लग्नाच्या तयारीत आहेत. मात्र अजूनही आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त काही लागत नाहीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरताना दिसत आहेत. पण हे लग्न अजूनही कन्फर्म नाहीये.
का पुढे ढकलले जात आहे लग्न?
आलिया आणि रणबीर त्यांच्या येणाऱ्या चित्रपट व प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्या दोघांना डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे. त्याच्याच तयारीसाठी आणि व्यवस्थेसाठी बराच वेळ लागेल म्हणून, आता पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न होईल, असे म्हटले जात आहे. तसेच माध्यमातील वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर लग्नाआधी किंवा नंतर वेकेशनला जाऊ शकतात. आता ही बातमी किती खरी आहे हे येणाऱ्या काळामध्येच माहिती पडेल. या अगोदर अशी बातमी आली होती की, आलिया आणि रणबीरने विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नामुळे आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. (alia bhatt and ranbir kapoor wedding postpone know why)
एकमेकांबद्दल मोकळेपणाने व्यक्त करतात प्रेम
रणबीर आणि आलियाच्या लग्नाची वाट पाहात असलेल्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आलिया आणि रणबीरचे नाते कोणापासून लपलेले नाहीये. ते दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसतात, मुलाखतींमध्ये एकमेकांविषयी बोलतात. इतकेच नव्हे, तर आलिया रणबीरसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.
गेल्या वर्षीच करणार होते लग्न
एका मुलाखतीदरम्यान रणबीरने सांगितले होते की, जर कोव्हिड आला नसता, तर त्याने मागच्याच वर्षी आलियाशी लग्न केले असते. आता ते सर्व वातावरण ठीक होण्याची वाट बघत आहे. जेणेकरून त्यांना एन्जॉय करता येईल.
रणबीर आणि आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर दोघ ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय आलिया ‘आरआरआर’, ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दिसणार आहे. तर रणबीर’ ऍनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो श्रद्धा कपूरसोबत लव रंजनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री
-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती