Sunday, June 23, 2024

पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे दोन्ही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सेलिब्रिटी कपल राजस्थानच्या रणथंबोरमध्ये ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र, आजपर्यंत याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

बुक झाले आहेत सगळे हॉटेल
एकीकडे विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, तर दुसरीकडे त्यांच्या लग्नाचे ठिकाण आणि पाहुण्यांबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. नुकत्याच आलेल्या एका ताज्या माहितीनुसार, कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी रणथंबोरमध्ये एकूण ४५ हॉटेल्स बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (katrina kaif and vicky kaushal marriage latest news couple booked all hotels in ranthambore)

लग्नाच्या तयारीने धरलाय जोर
माध्यमातील वृत्तानुसार, रणथंभोरची हॉटेल्स जास्त मोठी नसल्यामुळे, सेलिब्रिटी जोडप्याने एकूण ४५ हॉटेल पाहुण्यांसाठी बुकिंग करण्याची तयारी केली आहे. कारण लग्नाचे फंक्शन तीन दिवस चालणार असल्याने, अनेक दिवसांपासून हॉटेल्स बुक केल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे, स्थानिक हॉटेल्सनी इतर बुकिंग घेणे बंद केल्याचेही सांगितले जात आहे. साहजिकच त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

लवकरच येऊ शकतात लग्नाचे फोटो समोर
त्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहेत का? आतापर्यंत याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ अनेक अवॉर्ड शोमध्ये एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा