Saturday, March 2, 2024

आलिया-अल्लू आणि क्रितीला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, जाणून घेऊया राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कलाकारांची नावे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही कलाकारांसाठी एक विशेष संधी असते, ज्यामध्ये कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केले जाते. काही काळापूर्वी दिल्लीत ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असताना, दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील कलाकारांचा गौरव करण्यात येत आहे. या कलाकारांमध्ये आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, क्रिती सेनन आणि वहिदा रहमान या कलाकारांचा समावेश आहे. कोणता पुरस्कार कोणाला मिळाला हे जाणून घेऊया.

आपल्या अभिनयाने जगभरात नाव कमावणाऱ्या आलिया भट्टला तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आलिया भट्टला तिच्या लग्नाची साडी परिधान करून राष्ट्रपतींकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पती रणबीर कपूरसोबत आलेली आलिया रेड कार्पेटवर अवतरले होते.

आलियाप्रमाणेच क्रिती सेननही क्रीम रंगाची साडी परिधान करून पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली. ‘मिमी’ चित्रपटातील अभिनयासाठी क्रितीने आलियासोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार शेअर केला. या चित्रपटात तिने सरोगेट आईची भूमिका साकारली होती. रेड कार्पेटवर ती म्हणाली की, एवढी उत्तम भूमिका साकारायला मिळाल्याने ती धन्य आणि भाग्यवान आहे.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकला. अल्लू अर्जुनने या पुरस्काराने सन्मानित होणे ही दुहेरी कामगिरी असल्याचे वर्णन केले. तेलगू सिनेमातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक अल्लू अर्जुनने ‘पुष्पा: द राइज’मध्ये गँगस्टरची भूमिका साकारली होती.

आपल्या अभिनय कौशल्याने लोकांच्या हृदयात अमिट छाप सोडणारा अभिनेता पंकज त्रिपाठी यालाही यावर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मिमी’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यावेळी पंकज त्रिपाठी यांना खूप अभिमान वाटत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्टला मिळाला करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार, खास लग्नातील साडी घालून अभिनेत्रीने लावली हजेरी
पतीला सोडून गर्ल गॅंगसोबत परिणीती चोप्रा पोहचली मालदीवला, समुद्रातील फोटो केले शेअर

हे देखील वाचा