मूर्ती लहान कीर्ती महान! उंची कमी असून देखील ‘या’ अभिनेत्रींनी कमावलंय नाव


बॉलिवूडच्या या ग्लॅमरस दुनियेत असे कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या टॅलेंटच्या आधारावर चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव कमावले आहे. बॉलिवूड कलाकारांबाबत लोकांनी एक समज केला आहे. अभिनेत्री म्हणजे ती सुंदर, गोरीपान, उंच असावी असे सगळ्यांना वाटते. परंतु या सगळ्या व्याख्या डावलून काही अभिनेत्रींनी त्यांचे चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळे आणि खास निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या उंचीने जरी कमी असल्या तरीही त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक उंच अभिनेत्रींना मागे सारत त्यांचे अढळ स्थान प्रेक्षकांच्या मनात तयार केले आहे.

राणी मुखर्जी (Rani Mukherjee)
राणी मुखर्जी ही ग्लॅमर दुनियेतील एक मोठे नाव आहे. परंतु तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला तिच्या कमी उंचीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. राणीची उंची ५ फूट २ इंच एवढी आहे. तिच्या उंचीमुळे तिच्या हातातून अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर गेल्या आहेत. परंतु तरी देखील तिने हार मानली नाही आणि तिच्या सौंदर्याने आणि टॅलेंटने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

विद्या बालन (Vidya Balan)
याच यादीत पुढील नाव येते ते म्हणजे अभिनेत्री विद्या बालन. तिच्या अभिनयाच्या या प्रवासात तिने अनेक पात्र निभावून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विद्याची उंची ५ फूट ३ इंच एवढी आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक पात्र निभावले आहेत. तिचे वजन कमी असल्याने अनेकच चित्रपट तिच्या हातातून निघून गेले. त्यानंतर तिने तिचे वजन वाढवले. याचे फळ तिला नॅशनल अवॉर्डमध्ये मिळाले. ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी तिला नॅशनल अवॉर्डने सन्मानित केले.

आलिया भट्ट (Alia bhatt)
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वत्र तिचे नाव कमावले. बॉलिवूडमधील या क्यूट अभिनेत्रीची उंची ५ फूट ४ इंच एवढी आहे. परंतु चित्रपटसृष्टीतील तिने वेगाने घेतलेली धाव पाहून कोणीही याबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक मोठ्या अभिनेत्रींना मागे सारले आहे.

काजोल (kajol)
अभिनेत्री काजोल हिची बॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री अशी ओळख आहे. काजोलची उंची ५ फूट २ इंच एवढी आहे. परंतु या गोष्टीचा परिणाम तिच्या करिअरवर अजिबात झाला नाही. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचे नाव कमावले. तिने अनेक उंच अभिनेत्यांसोबत काम करून तिचे नाव कमावले आहे.

जया बच्चन (jaya bachchan)
जया बच्चन देखील बॉलिवूडमधील कमी उंची असलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांची उंची ५ फूट २ इंच एवढी आहे. त्यांनी ७० च्या दशकात त्यांनी रूपेरी पडद्यावर त्यांचे नाव चमकावले आहे.

त्यांनी अनेक चित्रपट काम करून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा :

 


Latest Post

error: Content is protected !!