अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांना कन्यारत्न झाली आहे. आजचा दिवस संपूर्ण कपूर कुटुंबासाठी विशेषत: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसाठी खूप आनंदाचा आहे. बॉलिवूडच्या या बहुचर्चित जोडीने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केल्यानंतर सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आलिया भट्टच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हापासून दोघेही खूप चर्चेत आहेत. त्याचवेळी बाळाची आजी नीतू कपूर हिने आजी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आलियाला भेटून रुग्णालयातून घरी परतलेल्या नीतू कपूर यांना काही फोटोग्राफार्सनी घेरलेलं दिसत आहे. ते नीतू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नीतू कपूरला प्रश्न विचारला की, “तुम्ही आजी झाल्या आहेस… लक्ष्मी घरी आली आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे?” या प्रश्नावर नीतू कपूर म्हणाली, “मला काय सांगायचे आहे…मी खूप आनंदी आहे.”
View this post on Instagram
तसेच आलियाच्या तब्येतीची आणि त्यांच्या नातीचीही चौकशी करताना दिसत आहेत. नीतू कपूर यांनी सांगितले की आलिया आणि बाळाची तब्येत एकदम उत्तम आहे. तसेच मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला. मात्र जेव्हा मुलगी कोणासारखी दिसते असं विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, “अजून बाळ लहान आहे. त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही.” नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होताना दिसतोय.
यादरम्यान पापाराझींनी नीतू कपूरला असेही विचारले की, आलिया भट्ट किंवा रणबीर कपूरचे बाळ कोणावर गेले आहे? याबाबत नीतू कपूर म्हणाली, “सध्या बाळ खूप लहान आहे, आजच घडले आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही.” यादरम्यान आलिया भट्ट कशी आहे, असे विचारले असता? नीतू कपूने म्हणाली, “परफेक्ट… ठीक आहे… सर्व काही ठीक आहे.” बाळाच्या जन्मानंतर, नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांशी ही माहिती दिली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! लग्नानंतरही श्वेता बच्चनला करावी लागली नोकरी, भाऊ अभिषेककडून घ्यावे लागले कर्ज
अर्रर्र! ‘या’ कारणांमुळे बाहुबली अभीनेत्री अनुष्का शेट्टीने कापले लांब केस