Pushpa: समंथाच्या गाण्याविरुद्ध तक्रार दाखल, करण्यात आली बंदीची मागणी


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ‘ओ अंतवा’ हे आयटम सॉन्ग रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात समंथा रुथ प्रभूच्या जबरदस्त डान्स मूव्हज पाहायला मिळाल्या. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच एका आयटम सॉन्गमध्ये दिसल्याने या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे.

हे गाणे जबरदस्त हिट होत आहे. मात्र, आता याच गाण्यामुळे चित्रपट अडचणीत आला आहे. खरं तर, समंथाच्या या गाण्याबाबत पुरुषांच्या संघटनेने गुन्हा दाखल केला आहे. या गाण्यातून पुरुषांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आंध्र प्रदेश न्यायालयात या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणानंतर आता चित्रपटाचे निर्माते नाराज झाले आहेत. कारण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच चित्रपट मोठ्या अडचणीत अडकला आहे. समंथाचे हे गाणे देवी श्री प्रसाद याने संगीतबद्ध केले आहे, तर गीत विवेक याने तामिळमध्ये आणि चांगराबोसने तेलुगूमध्ये लिहले आहे.

हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला असून, यात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मित्री फिल्म मेकर्सने केली आहे. तर हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाची स्टोरी लाईन खूप मोठी आहे. त्यामुळे हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रस्तावनेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर, निर्मात्यांना हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

 


Latest Post

error: Content is protected !!