Tuesday, April 28, 2026
Home बॉलीवूड अजय देवगन फंटूश गँगसोबत पुन्हा दिसला, ऊटीतील फोटो व्हायरल, 5 सीट्सची बाईक ठरली चर्चेचा विषय

अजय देवगन फंटूश गँगसोबत पुन्हा दिसला, ऊटीतील फोटो व्हायरल, 5 सीट्सची बाईक ठरली चर्चेचा विषय

भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे की त्याचे अनेक सिक्वेल्स आले आणि तरीही त्या चित्रपट विषयी प्रेक्षकांची क्रेझ काही कमी झाली नाही असाच एक चित्रपट म्हणजे गोलमाल. या चित्रपटाचे आतापर्यंत चार सिक्वेल आले आहेत. तरीही या चित्रपटाविषयी तितकीच प्रेक्षकांना ओढ आहे. तर आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या यशस्वी फ्रँचायझीच्या पाचव्या भागाचे, ‘गोलमाल 5’ चे चित्रीकरण सुरू झाले आहे, तर ही माहीती अजय देवगणने दिली आहे. तर काल ही माहीती सोशल मिडीयावर शेअर केली आहे. 

अजय (ajay)देवगनने इंस्टाग्रामवर गोलमाल 4  चित्रपटाच्या टिम सोबतचा फोटो शेअर केला आहे. तर या  फोटोमध्ये तो अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि शर्मन जोशी यांच्यासोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना या सुपरस्टारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “यावेळी प्रवास अधिक लांबचा आहे आणि मनोरंजन त्याहूनही मोठे आहे. मुलांसोबत ‘गोलमाल 5’ चे ऊटी शेड्यूल.” अजयच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की ‘गोलमाल 5’ चे ऊटीमधील शूटिंग शेड्यूल अधिकृतपणे सुरू झाले आहे. पण, या पोस्टमध्ये ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ती म्हणजे ‘फंटूश’ गँगची बाईक, जी आता पूर्वीपेक्षा मोठी झाली आहे. अजय देवगनने यापूर्वीच संकेत दिले होते की, या वेळी ‘गोलमाल’ची बाईक आणखी मोठी असेल, कारण पहिल्या चित्रपटानंतर बऱ्याच कालावधीनंतर शर्मन जोशी या फ्रँचायझीमध्ये परतला आहे.

गोलमाल चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोलमाल 500 अधिकृत घोषणा केली होती. त्यासोबत टीजर ही प्रदर्शित केला होता. तर प्रेक्षकांसाठी अजून एक सरप्राईज असणार आहे ते म्हणजे गोलमाल 5 मध्ये अक्षय कुमार याची एन्ट्री होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

संजय दत्त महिला आयोगाच्या सुनावणीला उपस्थित, गाण्याच्या वादाबद्दल माफी मागितली; ५० मुलींच्या शिक्षणासाठी निधी देणार

हे देखील वाचा